डॉ. सुजय विखे नगर दक्षिण मतदारसंघाचे भावी खासदार !

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- लेक वाचवा या अभियानांतर्गत तीन दिवसीय सक्षम महिला कर्जत महोत्सवाचे आयोजन जनसेवा फाउंडेशन, पंचायत समिती, महिला विकास महामंडळ आणि तालुका कृषी विभाग यांच्या संयुक्‍त विद्यमाने आयोजन केले आहे. श्री संत गोदड महाराज क्रीडानगरीमध्ये या महोत्सवाचे उदघाट्‌न शनिवारी (दि.24) सिनेअभिनेत्री सोनाली कुलकर्णी आणि जनसेवा फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. सुजय विखे यांच्या हस्ते पार पडले.


----------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
-------------------------------
डॉ. सुजय विखे नगर दक्षिण मतदारसंघाचे भावी खासदार असून, ते आम्हा सर्व महिला भगिनींसाठी पोस्टर बॉय आहेत, असे प्रतिपादन अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांनी कर्जत येथे हजारोंच्या उपस्थितीमध्ये जाहीर केले आणि त्यावेळी प्रचंड टाळ्यांचा कडकडाट येथे झाला.

यावेळी डॉ. सुजय विखे म्हणाले, महिला बचतगट संकल्पनाद्वारे महिलांच्या सक्षमीकरणासाठी कर्जत महोत्सवाचे आयोजन केले आहे. अशा महोत्सवामुळे महिला बचतगटांमार्फत महिलांना रोजगार उपलब्ध होणार आहे. कागदोपत्री असणारे महिला बचतगटाचे पूनर्जीवन होण्यास मदत मिळणार आहे. घरबसल्या महिलांना रोजगार उपलब्ध करणे हा मानस आहे. यात कोणतेही राजकारण आणणार नसून फक्‍त महिलांना रोजगार उपलब्ध करण्यासाठी काम करणार आहे. कर्जतच्या मातीत अनेक महिलांनी आपल्या कार्यक्षेत्रात उल्लेखनीय कार्य केले आहे. त्यांचा सन्मान करने आपले भाग्य आहे. प्रत्येकाने या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.

सिनेअभिनेत्री सोनाली कुलकर्णी म्हणाली, कर्जत महोत्सवामुळे अनेक महिलाभगिनींना रोजगार मिळणार आहे. महिला बचतगटाच्या कार्यक्रमाला पुरुषांचा पाठिंबा पाहून समाधान वाटत आहे. कुटुंबातील प्रत्येक पुरुषांनी महिलांना आणि त्यांच्या कर्तृत्वाला चालना देण्यासाठी पुढे यायला हवे. यासह पुरुष आणि तरुणवर्गांनी महिलांच्या सुरक्षेसाठी जबाबदारी घेत स्री वर्गाचा सन्मान राखायला, हवे असे आवाहन केले. डॉ. सुजय विखे यांनी आपल्याला अशा आगळ्या वेगळ्या कार्यक्रमाला आमंत्रित केले त्याबद्दल आभार मानते असेही सोनाली कुलकर्णी म्हणाली.
--------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN
----------------------------------
या महोत्सवामध्ये तालुक्‍यातील विविध क्षेत्रात काम करणाऱ्या महिला आणि युवतींचा सन्मान करण्यात आला. यावेळी कॉंग्रेसचे माजी जि. प. सदस्य प्रवीण घुले, अंबादास पिसाळ, कर्जतचे युवक नेते दादा सोनमाळी, ऍड. कैलास शेवाळे, बापूराव गायकवाड, हर्षद शेवाळे, तात्यासाहेब ढेरे, डॉ. संदीप बरबडे, मोनाली तोटे, सुनंदा पिसाळ आदी कार्यकर्ते, मोठा जनसुमदाय उपस्थित होता. सूत्रसंचालन प्रा. दिनेश भाने यांनी केले. दादासाहेब सोनमाळी यांनी आभार मानले. या कार्यक्रमाला शहरासह तालुक्‍यातून महिलांनी गर्दी केली होती. यावेळी येथील स्टॉलवरही खरेदीसाठी गर्दी दिसून आली.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.