तरुणीची गळफास घेऊन आत्महत्या.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- संगमनेर तालुक्यातील बोटा येथील सोनम हरिभाऊ शेळके (वय २७) या तरुणीने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना शुक्रवारी (दि. २३) साडेचार वाजेच्या पूर्वी घडली आहे.

----------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
-------------------------------
याबाबत घारगाव पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, सोनम शेळके ही आपल्या कुटुंबासोबत बोटा याठिकाणी राहत होती. शुक्रवारी घरात कोणी नसताना तिने आतून कडी लावत घरातील छताला असणाऱ्या लोखंडी हुकाला ओढणीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.

दुपारी तिचा भाऊ अजित हा घरी आला असता त्याला दरवाजा लावलेल्या अवस्थेत दिसला. त्यामुळे तो घाबरुन गेला दरवाजा कोणी उघडत नसल्याने शेवटी दरवाजा तोडण्यात आला तर समोर सोनमने गळफास घेऊन आत्महत्या केली होती. नेमकी सोनमने का आत्महत्या केली. त्याचे कारण समजू शकले नाही. 
--------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN
----------------------------------
याप्रकरणी तिचा भाऊ अजित हरिभाऊ शेळके यांनी दिलेल्या खबरीवरुन घारगाव पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक दिलीप निघोट यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार एस. के.भांगरे हे करत आहे.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.