राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदी पुन्हा घुलेच.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या पक्षातंर्गत निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाली असून येत्या 25 फेब्रुवारीला तालुकाध्यक्ष तर दि. 4 मार्च रोजी जिल्हाध्यक्षासह नगर शहर जिल्हाध्यक्ष पदासाठी निवडणुक होणार असल्याची माहिती पक्षाचे निवडणुक अधिकारी अंकुश काकडे यांनी पत्रकार परिषदेत दिली. 

----------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
-------------------------------
जिल्हाध्यक्षपदाच्या शर्यातीमध्ये विद्यमान जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर घुले यांच्या विरोधात उमेदवार सध्या तरी दिसत नसल्याने तसेच आगामी निवडणुकांचा विचार करता घुले हे एकमेव जिल्हाध्यक्ष पदाचे दावेदार ठरत असल्याने त्याची पुन्हा जिल्हाध्यक्षपदी निवड होण्याची शक्‍यता आहे.

पक्षातंर्गत निवडणुकीचा कार्यक्रम जाहिर झाल्यानंतर याबाबत कार्यकर्त्यांनी माहिती देण्यासाठी आज पक्षाच्या कार्यालयात काकडे यांच्या उपस्थितीत बैठक झाली. त्यानंतर काकडे पत्रकार परिषदेत बोलत होते. ते म्हणाले की, पक्षांतर्गत निवडणुकीसाठी राज्य निवडणुक अधिकारी म्हणून पक्षाचे ज्येष्ठ नेते व विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे यांनी निवड करण्यात आली असून नगर जिल्ह्याच्या निवडणुकीसाठी माझी निवड केली आहे. 
--------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN
----------------------------------
त्यानुसार येत्या 25 फेब्रुवारीपर्यंत तालुकाध्यक्षाची निवड केली जाणार आहे.या निवडीबरोबर तालुका कार्यकारिणी देखील निवडण्यात येणार आहे. त्यावेळी प्रत्येक तालुक्‍यातील तीन सदस्याची प्रदेशवर निवड होणार असून त्यानंतर दि. 4 मार्च रोजी नगर शहर जिल्हाध्यक्ष व ग्रामीण जिल्हाध्यक्षपदासाठी निवडणूक होणार आहे. त्यानंतर पक्षाच्या अन्य 24 सेलच्या पदाधिकाऱ्यांची निवड केली जाणार आहे.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.