मुंडे असते तर कॅबिनेटमंत्री म्हणून शपथ घेतली असती - आ.शिवाजी कर्डिले.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- मतदारसंघातील प्रत्येक गावच्या समस्या समजावून घेण आणि त्याची वेळेत सोडवणूक करण्याची तत्परता दाखवण्याचे काम आमदार शिवाजीराव कर्डिले यांनी केले आहे. आजही नगर तालूक्यात त्यांच्या कार्यकाळात झालेली विकास कामे सर्व काही बोलून दाखवताहेत असे प्रतिपादन मेहेकरी येथील सदगुरू संस्थानचे मठाधिपती लक्ष्मण महाराज कराड यांनी केले. 


----------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
-------------------------------
नगर तालुक्यातील मेहेकरी येथे ग्रामपंचायतच्या माध्यमातून करण्यात येणाऱ्या ७५ लाख रुपये खर्चाच्या विविध विकासकामांचे भूमिपूजन आमदार राहुल जगताप यांच्या हस्ते व आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या अध्यक्षतेखाली पार पडले. 

मुंडे असते तर पहिल्याच रांगेत कॅबिनेटमंत्री म्हणून शपथ !
आ.कर्डिले म्हणाले की, राज्यात व देशात सत्ता असल्याने भरीव निधी मतदारसंघासाठी आणता येत असून, लोकनेते गोपीनाथ मंडे यांच्या विश्वासामुळेच राहुरी मतदारसंघतून आमदार होता आले. मुंडे असते तर पहिल्याच रांगेत कॅबिनेटमंत्री म्हणून शपथ घेतली असती. परंतु ना.पंकजाताई मुंडे यांच्या माध्यमातूनसुद्धा भरीव विकासनिधी मिळत असल्याचे समाधान आ.कर्डिले यांनी व्यक्त केले. 

विकासकामात लोकप्रतिनिधींनीच नव्हे तर प्रत्येक गावाने एकत्र येण्याची गरज
यावेळी लक्ष्मण महाराज कराड म्हणाले की, सर्व जातीधर्माच्या लोकांना विकासाच्या दृष्टीने घेवून जाणार एक प्रेमळ व्यक्तीमत्व म्हणून आ.कर्डिले यांची जिल्ह्यात ओळख आहे. मेहेकरी गावासह सदगुरू संस्थानला देखील त्यांनी विकासनिधी देण्याचे काम केले आहे. त्याच पध्दतीत थोडया दिवसात मतदारसंघातील जनमाणसाचा विकास कामांतून विश्वास संपादन करण्याचे काम आमदार राहुल जगताप यांनी केले असल्याचे सांगत. विकासकामात लोकप्रतिनिधींनीच नव्हे तर प्रत्येक गावाने एकत्र येण्याची गरज असल्याचे कराड महाराज म्हणाले. 
--------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN
----------------------------------
या कार्यक्रमाप्रसंगी मार्केट कमिटीचे अध्यक्ष विलासराव शिंदे, उपाध्यक्ष रेवनणाथ चोभे, खरेदी विक्री संघाचे उपाध्यक्ष संभाजी पवार, बाजार समितीचे संचालक बाबा खर्से,बन्सी कराळे, वाघेश्वरी दूध संघाचे अध्यक्ष दीपक लांडगे, भाजपचे तालूका अध्यक्ष दिलीप भालसिंग,पं.स सदस्य राहुल पानसरे, माजी पं.स.राजू लांडगे, सरपंच राम पानमळकर, युवानेते सुधीर पोटे, संभाजी पालवे, चंद्रकांत पालवे, गुलाबराव लांडगे, मेहेकरीचे सरपंच संतोष पालवे, उपसरपंच छगनराव कानडे, तहसीलदार आप्पासाहेब शिंदे, उपअभियंता भागवत, ग्रामसेवक एस.बी.पालवे यांच्यासह अनेक ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.