संगमनेर शहरात तीन दुचाकी जाळल्या

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- संगमनेर शहरात गुरुवारी मध्यरात्री अकोले नाका आणि परिसरात तीन दुचाकी जाळण्याचा प्रकार घडला. या दुचाकी कोणी व कशासाठी जाळल्या हे अद्यापि समोर आले नसल्याने घराबाहेर दुचाकी लावणाऱ्या दुचाकीधारकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. शहर पोलिसांनी यासंदर्भात अकस्मात जळिताची नोंद केली.

----------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
-------------------------------
अकोले नाका परिसरात शारदा विद्यालयासमोर ऍक्‍टिव्हा स्कुटी जाळण्यात आली. ही दुचाकी जाळण्यापूर्वी या परिसरात काही जणांत मोठा वाद निर्माण झाला होता. घटनास्थळी पोलीस पोहोचल्यानंतर दुचाकीचा केवळ सांगाडा शिल्लक राहिला होता. मात्र, येथील वाद आपसात मिटल्याने यासंदर्भात पोलीस ठाण्यात कोणतीही तक्रार दाखल नसल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

मोमीनपुरा परिसरात दुचाकी खरेदी-विक्रीचा व्यवसाय करणाऱ्या गुलाम मोहंमद यांच्या दुकानासमोर साखळीने बांधलेल्या दोन दुचाकी मोटारसायकली रात्री अज्ञात व्यक्तीने पेटवून दिल्याने त्यांचे देखील मोठे नुकसान झाले. पेटवून दिलेल्या दुचाकीत बजाज डिस्कव्हर (एमएच 44 ई 5016) व बजाज बॉक्‍सर (एमएच 17 बी 8935) या वाहनांचा समावेश आहे.
--------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN
----------------------------------
मध्यरात्रीच्या वेळी या दुचाकी पेटवून देण्यात आल्याचे समोर आले. या दोन्ही दुचाकींसंदर्भात पोलिसांनी अकस्मात जळिताची नोंद केली आहे. जवळच एक रिक्षादेखील पेटविण्याचा प्रयत्न झाल्याचे सांगण्यात आले. एकाच वेळी शहरात जवळपास दोनशे मीटर अंतरात या घटना घडल्याने हे कृत्य कोणी जाणीवपूर्वक केले असल्यास त्याचा शोध घेण्याची मागणी नागरिकांमधून होत आहे.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.