उपमहापौर निवडणुकीत मोठ्या राजकीय घडामोडी घडण्याची चिन्हे !

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :-  मनपा उपमहापौरपदासाठी 5 मार्च रोजी निवडणूक होत आहे. उपमहापौरपदासाठी भाजपतील काही नावे चर्चेत असताना शिवसेनेतूनही काहीजण इच्छुक आहेत. उपमहापौर निवडणुकीसाठी दहा नगरसेवकांचा बंडखोर गट देखील सक्रिय झाला असून उपमहापौर निवडीच्या चाव्या आपल्या हातात ठेवण्याचा या गटाचा प्रयत्न आहे. उपमहापौर निवडणुकीत मोठ्या राजकीय घडामोडी घडण्याची चिन्हे आहेत. 

----------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
-------------------------------
श्रीपाद छिंदमचा उपमहापौरपदाचा राजीनामा मंजुर झाल्यामुळे नवीन उपमहापौर निवड 5 मार्चला होत आहे. उपमहापौरपदासाठी भाजपकडून दत्ता कावरे, बाबासाहेब वाकळे, उषा नलवडे यांची नावे सध्या चर्चेत आली आहेत. उपमहापौरपदासाठी भाजपतंर्गत गांधी-आगरकर गटात सव्वा- सव्वा वर्षाचा निर्णय झाला होता. मात्र, सव्वा वर्षे पुर्ण झाल्यानंतरही छिंदमने उपमहापौरपद सोडले नव्हते. 

छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह केलेल्या वक्तव्यामुळे त्याने उपमहापौरपदाचा राजीनामा दिला आहे. शिवसेनेचा महापौर होण्यासाठी उपमहापौरपदाच्या निवडणुकीतून कावरे यांनी माघार घेतली होती. कावरे यांच्यामुळे शिवसेनेचा महापौर बिनविरोध झाला होता. त्यामुळे दत्ता कावरे उपमहापौर होण्यासाठी शिवसेना आग्रही आहे. कावरे यांच्यासह भाजपचे बाबासाहेब वाकळे व उषा नलवडे यांचीही नावे उपमहापौरपदासाठी चर्चेत आली आहेत. 
--------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN
----------------------------------
कावरे यांच्या भूमिकेकडे शिवसेना लक्ष देऊन असून कावरे यांनी उपमहापौरपदासाठी होकार दिल्यास त्यांना पाठिंबा द्यायचा. जर त्यांनी नकार दिला तर शिवसेनेतुनही उपमहापौरासाठी मोर्चेबांधणी करण्याची रणनिती आखली जात आहे. उपनगराला संधी देण्याची मागणी भाजप व शिवसेनेतूनही पुढे येऊ लागली आहे. 

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.