राहुरी कारखान्याच्या माजी संचालकाच्या मुलावर चाकू हल्ला.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- राहुरी कारखान्याचे माजी संचालकाच्या मुलावर चाकू हल्ला करण्यात आला. (दि. २२) रात्री आठ वाजेच्या सुमारास वळदगाव -पढेगाव रस्त्यावर भैरवनाथ मंदिराजवळ ही घटना घडली. याप्रकरणी बेलापूर पोलीस चौकीत गुन्हा दाखल करण्यात आला असून संशयिताला अटक करण्यात आली आहे. यात एकजण गंभीर जखमी असून त्याच्यावर एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दोघेही एकमेकांचे जवळचे नातेवाईक आहेत.


----------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
-------------------------------
नीलेश ज्ञानेश्वर मांगुडे (रा. केंदळ, ता. राहुरी) असे संशयिताचे नाव आहे. याबाबत पोलिसांकडून समजलेली माहिती अशी : काल रात्री आठ वाजेच्यासुमारास संशयित नीलेश मांगुडे वळदगाव - पढेगाव रस्त्यावर भैरवनाथ मंदिराच्या मागे उभा असताना रवींद्र रमेश वारूळे (रा. ब्राह्मणगाव भांड, ता. राहुरी) यास बोलावून घेतले. यावेळी पैशांवरून वाद झाल्याने मांगुडे याने वारूळे याला चाकू मारला असता त्याच्या मानेवर तसेच हातमध्ये टाकल्याने डाव्या हताच्या बोटांना जखम झाली आहे.

घटनेनंतर वारूळे भैरवनाथ मंदिराच्या दिशेने पळाला. तेथील पुजारी व अन्य लोकांच्या मदतीने त्याला शहरातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. रवींद्र हे अशोकनगर महाविद्यालयात नोकरीस आहेत. दरम्यान, आज संशयित मांगुडे हा बेलापूर पोलीस चौकीत स्वत:हून हजर झाला. 
--------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN
----------------------------------
याप्रकरणी कल्याणी रवींद्र वारूळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून बेलापूर पोलीस चौकीत गु.र.नं. ६३/१८, भादंवि कलम ३०७ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक संपत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक भोसले, हवालदार अतुल लोटके, भिंगारदिवे, पोकळे, गुंजाळ, सोळुंके अधिक तपास करीत आहेत.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.