निरव मोदीची नगरमध्ये दीडशे एकर जमीन !

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- पंजाब नॅशनल बँकेत हजारो कोटी रुपयांचा घोटाळा करुन पसार झालेला हिरे व्यापारी नीरव मोदी याची नगर जिल्ह्यात तब्बल 153 एकर जमीन असल्याची माहिती उजेडात आली आहे. नगर-पुणे रस्त्यावर ही जमीन असल्याचे समजते. ही जमीन पंजाब नॅशनल बँकेने आज जप्त केली आहे.

----------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
-------------------------------
निर्यातीची बनावट हमीपत्रे तयार करुन नीरव मोदी याने पंजाब नॅशनल बँकेला तब्बल 11 हजार कोटींचा गंडा घातला आहे. हा गैरव्यवहार उघडकीस आल्यानंतर देशात एकच खळबळ उडाली असून, तत्पूर्वीच मोदी देशाबाहेर पसार झाला आहे. 
--------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN
----------------------------------
दरम्यान, सरकारी यंत्रणांनी त्याच्या मालमत्ता जप्तीचे सत्र सुरू केले असून, त्यादृष्टीने त्याची घरे, व्यावसायिक कार्यालये आदी ठिकाणी काटेकोर तपासणी सुरू असून, या तपासणीतच नगर येथे नीरव मोदी याची 153 एकर जमीन असल्याचे पीएनबीच्या लक्षात आले. या जमीनीची कागदपत्रेही पीएनबीला प्राप्त झाली असून, त्यानुसार तातडीने कारवाई करुन ही जमीन आजच बँकेने जप्त केली आहे. 

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.