अखेर खासदार दिलीप गांधी आणि सुवेंद्र गांधी विरोधात गुन्हा दाखल.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- नगर दक्षिण मतदारसंघाचे भाजपचे खासदार  दिलीप गांधी यांच्यासह त्यांचे पुञ नगरसेवक सुवेंद्र गांधी, पवन गांधी सचिन गायकवाड यांच्यावर खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


----------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
-------------------------------
नगर मधील फोर्ड शोरुमचे मालक भुषण बिहाणी यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून  या गुन्हाचा तपास सीआयडीकडं वर्ग करण्याचे औरंगाबाद उच्च न्यायालयाचा आदेश आहेत


29 सप्टेंबर 2015 ची ही घटना असून या बाबतचे सर्व कॉल रेकॉर्ड फोन मेसेज बिहानी यांनी पोलिसांना दिले आहेत या चौघांविरोधात IPC 120 बी ,117,323,364अ ,366,380,384,385,389,आणी 34 प्रमाणे गुन्हे दाखल झाले आहेत.

काय आहे प्रकरण?
2014 साली खासदार गांधी यांनी बिहाणी यांच्या फोर्ड शोरुममधून इन्डेवर कार खरेदी केली होती. मात्र यानंतर गांधी यांनी सप्टेंबर महिन्यात गाडीच्या परफॉर्मन्स बाबत तक्रार केली. या प्रकरणी जून 2015 साली सुवेंद्र गांधींनी सहकाऱ्यांच्या मदतीने शोरुमधील मॅनेजरचं अपहरण केलं. त्याचबरोबर मारहाण करुन त्यांच्याकडे खंडणीची मागणी केली. तर खासदार दिलीप गांधी यांनी खासदार पदाचा वापर करुन माझ्याबाबत मंत्री आणि आयकर विभागाला तक्रार केल्याची बिहाणी यांची याचिका आहे.

नोव्हेंबर 2016 ला पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पोलीस अधीक्षकांकडे तक्रार केली. पोलीस अधीक्षकांनी चौकशी केली, मात्र काहीच आढळून न आल्याने गुन्हा दाखल झाला नाही. त्यामुळे बिहाणी यांनी न्यायालयात धाव घेऊन सीबीआय चौकशीची मागणी केली होती.त्यानुसार न्यायालयान या प्रकरणी सबंधीतांवर 24 तासात गुन्हा दाखल करण्याचे निर्देश दिले.

मारहाण, अपहरण व खंडणीप्रकरणी खा.दिलीप गांधी यांच्या अडचणींमध्ये वाढ.http://www.ahmednagarlive24.com/2018/02/news-2401.html

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
-------------------------------
Powered by Blogger.