सात्रळ बाजारपेठेतील दुकानांचे शटर उचकटत जबरी चोरी.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :राहुरी तालुक्यातील सात्रळ येथील शुक्रवारी मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात दरोडेखोरांनी सात्रळ -चणेगाव रोडवरील नविन व्यापारी संकुलातील दुकानांचे शटर उचकटत जबरी चोरी करण्याचा प्रयत्न केला असता त्यांत त्यांनी सुमारे पन्नास हजारांचा मुद्देमाल लंपास केला आहे.

----------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
-------------------------------
याबाबत पोलिस सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार सात्रळ -चणेगाव रोडवर अद्ययावत नविन व्यापारी संकुल असुन शुक्रवारी पहाटे दिड वाजण्याच्या सुमारास अज्ञात इसमांनी चोरी करण्याच्या उद्देश्याने येत या ठिकाणी व्यापारी संकुलाला वीज पुरवठा करणाऱ्या वीज रोहीत्राचा वीज पुरवठा खंडित करत या ठिकाणी असणाऱ्या सागर यशवंतराव अंत्रे यांच्या आयुष मोबाईल शॉपी ,सत्तार तांबोळी यांच्या पंचवटी सुपर किराणा शॉपी ,विशाल भारत भोत यांचे विशाल फॅशन या दुकानांचे कटावनीच्या साह्याने शटर उचकटत जबरी चोरीचा प्रयत्न केला.

या घटनेत सागर अंत्रे यांच्या आयुष मोबाईल शॉपीतील सुमारे चाळीस हजार रु किमतीचे मोबाईल, त्यानंतर शेजारील असणाऱ्या सत्तार तांबोळी यांच्या पंचवटी सुपर किराणा शॉपीतील गल्यातील रोख रक्कम सुमारे पाच हजार रुपये या मुद्दे मालावर डल्ला मारत पूर्व दिशेला असलेल्या विशाल भोत यांच्या विशाल फॅशन या दुकानाचे चोरीच्या उद्देशाने चोरीचा प्रयत्न केला परंतु या दुकांचे शटर तोडण्यात हे चोरटे अयशस्वी झाले त्यामुळे त्याना या ठिकाणावरून खाली हात परतावे लागले.


सदर प्रकार सकाळी सत्तार तांबोळी यांच्या लक्षात आला असता त्यांनी घटनेची माहिती सोनगावच्या पोलीस पाटील अनिता अंत्रे ,सात्रळचे पोलीस पाटील भास्कर गुलाब पलघडमल याना देत घटनेची खबर राहुरी पोलीस स्टेशनला कळवली या नंतर राहुरी पोलीस ठाण्याचे पो.नि..प्रमोद वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली तासाभरात घटनास्थळी पो.हे.कॉ.एस.जी.रोकडे, पो.ना.एस.एम.जाधव, पो.हे.कॉ.व्ही.एस.वाघस्कर यांनी येत चोरी झालेल्या दुकानाची पहाणी करत घटनास्थळी नगर येथील श्वानपथक व ठसे तज्ञांना पाचारण करण्यात आले. या वेळी नगर येथून श्वान पथकातील पो.उप.नि.एस.डी.बावळे व पो.कॉ.यु.आर.गोसावी यांनी सोबत असलेल्या रक्षा या श्वानाला घटनास्थळा वरील वस्तूंचा वास दिला असता त्या श्वानाने घटनास्थळा पासून पाचशे मीटर अंतरावरील अनापवाडी काॅर्नर फाट्या पर्यंत मार्ग दाखवला व तेथून पुढे चोरट्यांनी अज्ञात वाहनाने पसार झाले असावे अशी शक्यता श्वान पथकातील अधिकाऱ्यांनी व्यक्त केली.


तसेच या वेळी या ठिकाणी नगर येथील अंगुलीमुद्रा ठसेतज्ञ पथकातील सा.पो.नि.धुमाळ मॅडम यांनीही या ठिकाणी चोरी झालेल्या घटनास्थळा वर आढळलेले अज्ञात चोरट्यांचे ठसे घेतले या नंतर पोलिसांनी या घटनास्थळा शेजारी असणाऱ्या सुख शांती इलेक्ट्रिकल व शेजारी साई टेलर्स या दुकानानचे सी.सी.टीव्ही फुटेज तपासले असता या सी.सी.टीव्ही फुटेज मध्ये दिड वाजण्याच्या सुमारास अज्ञात दोन चोरटे अंगात जाकेट घातलेले तोंडाला रुमाल बाधलेले संशयित रित्या वावरताना आढळून आले पोलिसांनी पुढील तपासाठी हे सी.सी.टी.व्ही फुटेज ताब्यात घेतले असून या घटने बाबत राहुरी पोलीस स्टेशनला अज्ञात चोरट्यान विरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आसून पुढील तपास राहुरी पोलीस करत आहेत.

अद्याप यापूर्वीच्या एकाही चोरीचा तपास नाही.
सोनगाव,सात्रळ,धानोरे,सह पंचक्रोशीत या पुर्वी मोठ्या प्रमाणात जबरी चोऱ्या झाल्या असून यात लाखोचा मुद्दे माल लंपास झाला आहे. त्यांचा तपास आजतागायत लागलेला नाही. तसेच परिसराच्या भौगोलिक दृष्ट्या पोलिसांचे पुरेशे संख्याबळ नाही व रात्री बेरात्री या परिसरात पोलीस प्रशासन सातत्याने गस्त घालत नसल्यामुळे यामुळे चोरट्याना चोरी करणे सोपे जाते.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.