पोलिस ठाण्याच्या आवारात युवकाचा आत्महत्येचा प्रयत्न

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- तोफखाना पोलिस ठाण्याच्या आवारात एका युवकाने अंगावर डिझेल ओतून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी यावेळी तात्काळ हस्तक्षेप केल्याने पुढील अनर्थ टळला. याप्रकरणी संबंधित युवकावर तोफखाना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

----------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
-------------------------------
याबाबत सविस्तर माहिती अशी की, गुरुवार दि. २३ रोजी सायंकाळी ५.४५ वाजण्याच्या दरम्यान गणेश संपत कराळे (रा. शेंडी पोखर्डी, ता. नगर) याने कौटुंबिक वादातून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. कराळे हा त्याची पत्नी नांदत नसल्याची तक्रार घेवून गुरुवारी सकाळी आला होता. 

त्याने त्याची समस्या सांगण्यास सुरूवात केली तेव्हा ठाणे अंमलदार ए. बी. घोरपडे यांनी त्याला तक्रार कागदावर नोंदविण्यास सांगितले. मात्र कराळे तेथून निघून गेला व पुन्हा सायंकाळच्या सुमारास तो पोलिस ठाण्याच्या आवारात आला. 
--------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN
----------------------------------

तेव्हा त्याने मोठ्या आवाजात पत्नी नांदत नसल्याचे सांगत अचानक खिशातील बाटलीतील डिझेल अंगावर ओतून घेतले.पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करत पुढील अनर्थ टाळला. या घटनेमुळे पोलिस ठाण्यात काही काळ धावपळ उडाली होती. या प्रकरणी कराळे याच्याविरुद्ध आत्महत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.