नगर दक्षिण मधील १५ वर्षांचा अनुशेष भरून काढावा लागणार - डॉ.सुजय विखे

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- जनतेला आपली गरज असेल तर जनता आपल्याला निवडेल. मात्र, निवडणुकीबाबत आपण अद्यापि काहीही ठरवलेले नाही. चांगले काम करत राहिले, पाहिजे यासाठी तालुक्यातील बचतगटांच्या माध्यमातून महिला सक्ष्मीकरणासाठी कर्जत महोत्सवाचे आयोजन करून तालुक्यात विविध उपक्रम राबविणार असल्याची माहिती डॉ. सुजय विखे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.

----------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
-------------------------------
' लेक वाचवा' अभियानांतर्गत कर्जत येथे दि. २४ ते दि. २६ फेब्रुवारी या कालावधीत सक्षम महिला कर्जत महोत्सव 2018 चे आयोजन या आयोजन केले आहे. या महोत्सवाच्या तयारीची पाहणी करण्यासाठी डॉ. विखे कर्जत येथे आले असता, ते पत्रकारांशी बोलत होते.

जनसेवा फाउंडेशनच्या वतीने आयोजित कर्जत महोत्सवात महिला बचतगटांनी तयार केलेल्या वस्तूंचे प्रदर्शन भरणार आहे. पंचायत समिती, महिला विकास महामंडळाच्या सहकार्याने बचतगटांचे १३० स्टॉल उभारण्यात येणार आहेत. दि. २४ रोजी कर्जत तालुक्यात विशेष कार्य करणाऱ्या महिलांचा गौरव सिनेअभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिच्या हस्ते केला जाणार आहे.

दि.२५ रोजी तालुक्यातील विविध शाळांतील मुलांचा सांस्कृतिक कार्यक्रम, दि.२६ रोजी या महोत्सवास उपस्थित असलेल्या लोकामधून 11 लोकांना लकी ड्रॉद्वारे बक्षिसे दिली जाणार आहेत. या वेळी डॉ. मिर्झा बेग यांचा हास्याचे फवारे हा कार्यक्रम होईल, अशी माहिती डॉ. विखे यांनी दिली.
--------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN
----------------------------------

हा सर्व कार्यक्रम मोफत आहे. डॉ. विखे यांच्या कर्जत येथील संपर्क कार्यालयाचे उद्घाटन दि. २४ रोजी जि. प. अध्यक्षा सौ. शालिनीताई विखे यांच्या हस्ते होणार आहे. या कार्यालयाच्या माध्यमातून तालुक्यातील जनतेची कामे मार्गी लावली ज़ाणार आहेत. सार्वजनिक जीवनात काम करत असताना जनतेची कामे केली पाहिजेत.

महोत्सवास जनतेने गर्दी केल्या तालुक्यातील महिलांचा फायदा होईल, त्यांचा फायदा झाला तर शेवटी माझाही फायदा होणारच आहे, असे सूचक वक्तव्य करत आपण सध्या तरी जिल्ह्यात जिल्हा विकास आघाडीचे पुनरुज्जीवन करण्याचा प्रयत्न करणार आहोत. निवडणूक कोणत्या पक्षाकडून लढवायची, हे अध्यापि ठरवलेले नाही.

जनतेने जबाबदारी दिल्यास ती समर्थपणे सांभाळू. दक्षिण भागातील विकासाचा १५ वर्षांचा अनुशेष भरून काढावा लागणार आहे. मी रात्रीच्या वाटपामध्ये विश्वास ठेवत नाही तर दिवसा वाटतो, असे म्हणत अहमदनगर दक्षिणमध्ये खासदारकी लढविण्याचे मनसुबे अप्रत्यक्षपणे व्यक्त केले.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.