पाथर्डीत चारित्र्याच्या संशयावरून पत्नीला ठार मारून मृतदेह घराशेजारी पुरला

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :-  चारित्र्याच्या संशयावरून शिरपूर येथील रमेश जाधव याने लाकडी दांडक्याने मारहाण करून आपली पत्नी हिराबाई (४५) हिचा निर्घृण खून करून पुरावा नष्ट करण्यासाठी घराशेजारीच मृतदेह पुरला. पोलिसांनी आरोपीला अटक केली.


----------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
-------------------------------
आरोपीच्या भावाने मृत महिलेच्या भावाला फोन करून घडलेला प्रकार सांगितला. तालुक्यातील कुत्तरवाडी येथून मृत महिलेचे कुटुंबीय शिरपूर येथे निघाले. झोपडपट्टीतील जाधवच्या घरी पोहोचण्यापूर्वीच पोलिस आले होते. घरातील कपड्यांवर रक्त पडलेले होते. छपरातील लाकडी दांड्याला रक्त लागले होते. पोलिसांनी आरोपीकडे चौकशी केली असता पत्नीचा खून करून मृतदेह पुरल्याचे त्याने सांगितले.
--------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN
----------------------------------

घराच्या बाजूस मोकळ्या जागेत मृतदेह पुरलेली जागा त्याने दाखवली. खड्ड्यातून मृतदेह बाहेर काढण्यात आला. मृत हिराबाईच्या अंगावर मारहाणीचे वळ होते. डोक्यावर जखमा होत्या.प्रशिक्षणार्थी उपअधीक्षक पौर्णिमा बांदल, निरीक्षक राकेश माणगावकर, सहायक निरीक्षक यशवंत राक्षे, उपनिरीक्षक पुंडलिक पावसे व वैभव पेठकर आदींनी घटनास्थळी भेट दिली.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.