दि.5 मार्चला उपमहापौरपदाची निवडणूक.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- श्रीपाद छिंदम याचा उपमहापौरपदाचा राजीनामा मंजूर झाल्यामुळे रिक्त झालेल्या उपमहापौरपदासाठी निवडणुक कार्यक्रम आज जाहीर करण्यात आला. दि.5 मार्च रोजी उपमहापौरपदासाठी निवडणूक होणार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्यामुळे श्रीपाद छिंदम याचा उपमहापौरपदाचा राजीनामा भाजपने घेऊन राजीनाम्याची प्रत महापौर कार्यालयास पाठविली होती. 

----------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
-------------------------------
त्यानंतर महापौर सुरेखा कदम यांनी श्रीपाद छिंदम याचा राजीनामा दि. 20 रोजी मंजुर करून तो आयुक्तांकडे पाठविला. आयुक्तांनीही पुढील कार्यवाहीसाठी प्रस्ताव विभागीय आयुक्तांकडे पाठविला होता. विभागीय आयुक्तांकडून उपमहापौर निवडणुकीचा कार्यक्रम आज मनपा प्रशासनाला पाठविण्याची शक्यता असल्याची माहिती समजली आहे. 
--------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN
----------------------------------

दरम्यान, उपमहापौरपदासाठी भाजपबरोबरच आता शिवसेनेतीलही नावे पुढे येऊ लागले आहेत. विरोधी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या गोटात अजून सामसूम आहे. मात्र, अखेरच्या टप्प्यात राष्ट्रवादी डावपेच आखण्याची शक्यता आहे.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.