मारहाण, अपहरण व खंडणीप्रकरणी खा.दिलीप गांधी यांच्या अडचणींमध्ये वाढ.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- नगर दक्षिणचे खा. दिलीप गांधी यांच्या अडचणी वाढल्या असून भूषण गोवर्धन बिहानी यांनी दाखल केलेल्या फौजदारी याचिकेची व त्यातील आरोपांची हायकोर्टाने गंभीर नोंद घेतली आहे. या प्रकरणात गुन्हा दाखल करण्याचे व पोलिसांना बी समरी सादर करण्याचे तसेच कोणत्याही दबावाला बळी न पडता सीआयडीला चौकशी करण्याचे आदेश न्या. एस. एस. शिंदे व न्या. ए. एम. ढवळे यांच्या खंडपीठाने दिले आहेत. 

----------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
-------------------------------
याचिकाकर्ता अथवा त्याच्या वडिलांनी २४ तासात संबंधीत पोलीस ठाण्यात हजर व्हावे. यापूर्वी २१ नोव्हेंबर २०१६ रोजी त्याने पोलीस अधिक्षकांकडे दिलेल्या निवेदनाआधारे लेखी अथवा तोंडी तक्रार द्यावी व पोलिसांनी संबंधितांवर गुन्हा दाखल करावा असे निकालपत्रात स्पष्ट करण्यात आले आहे. 

या प्रकरणात गृहमंत्रालय, जिल्हा पोलीस अधिक्षक, एमआयडीसी पोलीस ठाणे व पोलीस महासंचालकांना याचिकेत प्रतिवादी करण्यात आले होते. तसेच या प्रकरणात सचिन गायकवाड व सुवेंद्र दिलीप गांधी यांनीही मुळ याचिकाकर्ता भूषण बिहानी यांच्याविरोधात हायकोर्टात धाव घेतली होती.

याचिकेत म्हटल्यानुसार, डिसेंबर २०१४ ते मार्च २०१५ या कालावधीत खासदार दिलीप गांधी यांनी फोर्ड एन्डेव्हर ही कार त्यांच्या शो-रुममधून खरेदी केली. त्यानंतर लगेचच त्यांनी उत्पादनात दोष असल्याची तक्रार केली. २९ सप्टेंबर २०१५ रोजी सचिन गायकवाड, सुवेंद्र गांधी, पवन गांधी व इतर माणसांनी त्यांच्या सेल्स-मॅनेजरला मारहाण करत खंडणी मागितली. 
--------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN
----------------------------------

मात्र गांधी यांच्या राजकीय प्रभावाला घाबरुन याचिकाकर्त्याने पोलिसांमध्ये तक्रार दिली नाही. त्यानंतर त्रास वाढल्याने त्यांनी पंतप्रधानांकडे १० ऑक्टोबर २०१६ रोजी व लगेचच २१ नोव्हेंबर पोलीस अधिक्षकांकडे तक्रार दिली. पण पुढे कारवाई न झाल्याने त्यांनी सदर याचिका दाखल करत न्याय मागितला. 

याप्रकरणी एमआयडीसी पोलीस उपनिरीक्षकांनी शपथपत्र दाखल केले. त्यात पोलीस अधिक्षकांनी सदर प्रकरणात चौकशीचे व सविस्तर अहवाल सादर करण्याचे आदेश दिल्याचे म्हणणे मांडले. पण याचिकाकर्त्याने तपासात सहकार्य केले नाही. तसेच त्याने गुन्हा नोंदविण्यासाठी तक्रारही दिली नाही.

दरम्यान सचिन गायकवाड यांनी दाखल केलेल्या याचिकेत भूषण बिहानी यांनी त्यांच्याकडून २५ लाख रुपये हातऊसणे घेतल्याचा दावा केला. तसेच याचिकेतील आरोप फेटाळले. या प्रकरणाची गंभीर दखल घेत खंडपीठाने याचिकाकर्ता अथवा त्याच्या वडिलांनी २४ तासात संबंधीत पोलीस ठाण्यात हजर व्हावे. यापूर्वी २१ नोव्हेंबर २०१६ रोजी त्याने पोलीस अधिक्षकांकडे दिलेल्या निवेदनाआधारे लेखी अथवा तोंडी तक्रार द्यावी व पोलिसांनी संबंधितांवर गुन्हा दाखल करावा. तसेच सीआयडीला चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे खा. गांधी यांच्या अडचणींमध्ये वाढ होताना दिसून येत आहे.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.