शेवगाव तालुक्यात बिबट्याचा धुमाकुळ.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- गेल्या चार-पाच दिवसांपासून ढोरजळगाव परिसरात बिबट्याने सुरु केलेला धुमाकूळ थांबता थांबत नाही.बुधवारी रात्री काळजाचा थरकाप उडवणाऱ्या डरकाळीसह बिबट्याने येथील आसाराम नवले यांच्या राहत्या घरून एक शेळी ओढून नेली.

----------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
-------------------------------
गेल्या चार-पाच दिवसांपासून बिबट्याच्या वास्तव्याने धास्तावलेल्या नागरिकांची चांगलीच पाचावर धारण बसली आहे.गेल्या दोन दिवसांपूर्वी दत्तात्रय नवले यांच्या शेळ्यांच्या कळपातून बिबट्याने झडप घालून शेळी नेली. त्यानंतर नामदेव तेलधुणे यांच्या राहत्या घरून एक शेळी नेली. 

अशोक गवांदे यांच्या मालकीच्या करडालाही बिबट्याने गंभीर जखमी केले. शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांचीही संख्या यामुळे कमी झाली आहे. आजूबाजूला उसाची शेती आहे.त्यामुळे बिबट्याला येथे लपून बसण्यास सर्वत्र जागा आहे. रात्री-बेरात्री दारे धरण्यासाठी शेतात जाण्यास परिसरातील शेतकरी सध्या धजावत नसल्याचे येथील शेतकऱ्यांनी सांगितले.
--------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN
----------------------------------
दरम्यान, वनविभागाला याबाबत येथील शेतकऱ्यांनी कळवले असता वनपाल छबुराव रोडे, वनरक्षक बुधवंत, वनमजूर एस.व्ही.सोले यांनी घटनास्थळी आज भेट दिली असता तेथे एका मादी बिबट्याचे आणि अंदाजे साधारण 5-6 महिने वयाच्या बछड्याचे ठसे आढळले. शेतकऱ्यांनी येथे पिंजरा लावण्याची मागणी वनविभागाकडे केली असता बिबट्याची येण्या-जाण्याची जागा निश्‍चित करून लवकरच पिंजरा लावण्याचे आश्वासन रोडे यांनी दिले.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.