शिर्डीत चालत्या मालट्रकला आग.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- बंगळुरूहून दिल्लीकडे जाणाऱ्या मालट्रकला बुधवारी मध्यरात्री शिर्डीतील पाचशे खोल्यांच्या भक्तनिवासानजीक आग लागली. तशा अवस्थेत चालकाने ट्रक शहराबाहेर नेल्याने मोठा अनर्थ टळला. नगरपंचायतच्या अग्निशमन दलाने आग शमवण्यासाठी प्रयत्न केल्याने आणखी नुकसान ट‌ळण्यास मदत झाली. 

----------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
-------------------------------
तांब्याने भरलेला हा ट्रक (डीएल १ - जीसी ६१३५) अचानक पेटला. ट्रक पेटल्याचे चालकाच्या लक्षात आले, पण आग लागलेला ट्रक शहरात थांबवणे धोक्याचे असल्याने त्याने स्वतःच्या जीवाची पर्वा न करता प्रसंगावधान राखत पेटलेला ट्रक शहराबाहेर नेला. 
--------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN
----------------------------------
नागरिकांनी ही माहिती नगरपंचायतच्या अग्निशमन बंबास दिली. या दलाचे प्रमुख विलास लासुरे, फायरमन विजय गायकवाड, चालक दगू खरात यांनी तातडीने आग शमवण्याचा प्रयत्न केला. या आगीत जीवितहानी झाली नसली, तरी मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. आगीचे नेमके कारण समजू शकले नाही.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.