जिल्ह्यात एक कोटी 30 लाख रुपयांची वीजचोरी उघड.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- महावितरणने जिल्हाभरात तीन दिवस राबविलेल्या विशेष मोहिमेत एक कोटी 30 लाख रुपयांची वीजचोरी उघडकीस आली आहे. स्थानिक अभियंते, कर्मचारी आणि इतर जिल्ह्यातून आलेली भरारी पथके यांच्या संयुक्त विद्यमाने ही मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेत तपासणी करण्यात आलेल्या एकूण 1 हजार 102 ग्राहकांच्या मीटरपैकी 487 जणांकडे वीजचोरी आढळून आली असून संबंधितांविरुद्ध कारवाई सुरू आहे.

----------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
-------------------------------
वीज चोरीला आळा घालण्यासाठी महावितरणने जिल्ह्यात नुकतीच विशेष व व्यापक मोहीम राबविली. स्थानिक अभियंते व कर्मचाऱ्यांचे पथक तसेच औरंगाबाद, कल्याण, पुणे, नाशिक येथील भरारी पथके यांनी स्वतंत्रपणे या मोहिमेत सहभाग घेतला. या पथकांनी जिल्ह्यातील नगर शहर, ग्रामीण, कर्जत, श्रीरामपूर व संगमनेर या पाचही विभागांमध्ये सलग तीन दिवस व्यापक तपासणी मोहीम राबवून मोठ्या प्रमाणात वीजचोरी उघडकीस आणली. 

पथकाद्वारे 511 घरगुती, 480 व्यावसायिक व 111 औद्योगिक ग्राहकांच्या मीटरची तपासणी करण्यात आली. या तपासणीतून 487 ठिकाणी वीजचोरी होत असल्याचे समोर आले. त्यातील 221 घरगुती, 128 व्यावसायिक आणि 6 औद्योगिक अशा एकूण 311 ग्राहकांविरुद्ध वीज कायदा 2003 चे कलम 135 ते 138 नुसार, तर 176 ग्राहकांवर कलम 126 नुसार कारवाई सुरू आहे. स्थानिक अभियंते व कर्मचाऱ्यांच्या पथकाने 843 ग्राहकांकडे तपासणी करून 322 ठिकाणची वीजचोरी उघडकीस आणली, तर भरारी पथकाने तपासणी केलेल्या 259 ग्राहकांपैकी 165 जणांकडे वीज चोरी आढळून आली. विशेष मोहिमेत तपासणी करण्यात आलेल्या एकूण ग्राहकांपैकी 44 टक्‍क्‍यांपेक्षा अधिक ग्राहकांकडे वीजचोरी आढळून आली आहे.
--------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN
----------------------------------
कलम 135 ते 138 नुसार 311 जणांना 81 लाख 69 हजार रुपयांचे वीज चोरीचे बिल देण्यात आले असून, 20 लाख 47 हजार रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे. त्यातील 12 जणांनी वीजचोरीचे 4 लाख 31 हजार, तसेच दंडाची 91 हजार रुपयांची रक्कम भरली. तर, 8 जणांविरुद्ध वीज चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कलम 126 प्रमाणे कारवाई करण्यात आलेल्या 176 जणांना 48 लाख रुपयांच्या वीज चोरीचे बिल देण्यात आले असून, 10 जणांनी 3 लाख 64 हजार रुपयांचा भरणा केला आहे. मुख्य अभियंता दीपक कुमठेकर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच सुरक्षा व अंमलबजावणी विभागाचे उपसंचालक सुमित कुमार आणि अधीक्षक अभियंता अनिल बोरसे यांच्या नेतृत्वात ही मोहीम यशस्वी करण्यात अभियंते, कर्मचारी व भरारी पथकांनी परिश्रम केले.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.