राहुरी तालुक्यात दोघांची गळफास घेऊन आत्महत्या.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- राहुरी तालुक्यात दोघांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. पहिली घटना राहुरी खुर्द येथील बिहाणी यांच्या मळ्यात, तर दुसरी घटना राहुरी स्टेशन रोडवरील खळवाडी परिसरात घडली. अक्षय मच्छिंद्र मोईन (१९ वर्षे, राहणार राहुरी खुर्द) हा तरूण गुरूवारी सकाळी लिंबाच्या झाडाला साडीच्या पदराने गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला. 

----------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
-------------------------------
राहुरी खुर्द येथील पोलिस पाटील बबन अहिरे यांनी या घटनेची खबर पोलिसांना दिली. अक्षयने आत्महत्या केल्याची खबर परिसरात पसरताच घटनास्थळी बघ्यांची मोठी गर्दी जमली. शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. आत्महत्येचे नेमके कारण समजू शकले नाही. दुसऱ्या घटनेत विलास पवार (४८ वर्षे) याने गुरूवारी सकाळी राहत्या घरात गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली. 
--------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN
----------------------------------
विलासचा गळफास घेतलेल्या अवस्थेतील मृतदेह पाहून कुटुंबातील सदस्यांनी हंबरडा फोडला. विलास हा राहुरी येथे हार, फुलांची विक्री करत असे. त्याच्या आत्महत्येमागीलही कारण समजू शकले नाही. शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. राहुरीच्या गणपती घाट स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. एकाच दिवशी दोघांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याने राहुरीत हळहळ व्यक्त केली जात आहे.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.