जामखेड मध्ये बेकरीला आग लागून तीन लाखांचे नुकसान.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- जामखेड शहरातील बीड रोड कॉर्नरजवळील न्यू महाराष्ट्र बेकर्स या दुकानाला मध्यरात्री आग लागून तीन लाखांचे नुकसान झाले. नगरपरिषदेच्या अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी आग लवकर अाटोक्यात आणल्याने मोठा अनर्थ टळला.

----------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
-------------------------------
अमित गंभीर यांच्या मालकीचे हे दुकान आहे. नेहमीप्रमाणे रात्री दहा वाजता दुकान बंद करून ते घरी गेले. पहाटे चारच्या सुमारास या दुकानातून धूर येत आसल्याचे नगरपरिषदेचे कर्मचारी बाळू खेत्रे, अंकुश अदापुरे व पहाटे फिरायला आलेल्या नागरिकांच्या लक्षात आले. त्यांनी तातडीने ही घटना सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी यांना कळवली. कोठारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांना फोन केला. महावितरणच्या कार्यालयात फोन करून विद्युत पुरवठा बंद करण्यास सांगितले. दुकानाचे मालक अमित गंभीर यांनाही कळवण्यात आले.
--------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN
----------------------------------
अग्निशमन दलाचे कर्मचारी अय्यास शेख, विजय पवार, शंकर बोराटे यांनी दुकानाचे शटर उचकटून पाण्याच्या साह्याने आग शमवली. दुकानातील खारी, कोल्ड्रिंक, पनीरसह फ्रीज व फर्निचर असे एकूण तीन लाखांचे साहित्य जळून खाक झाले. कोणतीही जीवितहानी झाली नाही. कांतिलाल कोठारी, पवन कांकरिया, तुषार बोरा, गौरव अरोरा, अनिल बाफना यांनी आग तातडीने शमवण्यासाठी मदत केली.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.