अल्पवयीन मुलीवरील अत्याचार प्रकरणाचा कोपरगावात निषेध

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- दोंडाईचा (जि.धुळे) येथे अल्पवयीन मुलीवर झालेल्या अत्याचाराचा निषेध करीत आरोपींना कठोर शासन करण्याच्या मागणीसाठी शहर व तालुका तेली समाज व ओबीसी महासंघाच्या वतीने गुरूवारी तहसील कार्यालयावर मोर्चा नेण्यात आला.

----------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
-------------------------------
दोंडाईचा येथे एका पाचवर्षीय अल्पवयीन मुलीवर नराधमांनी अत्याचार केल्याची घटना घडली. सदर घटनेतील आरोपींना कठोर शासन होऊन अशा प्रवृत्तींचा बंदोबस्त करण्याच्या मागणीसाठी आज शहरातुन तहसील कार्यालयावर मोर्चा नेण्यात आला. आरोपींना शासन न झाल्यास जिल्हाभर आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे.
--------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN
----------------------------------
निवासी नायब तहसीलदार शिवाजी सुसरे यांनी निवेदन स्विकारले. मोर्चात महाराष्ट्र पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष काका कोयटे, महासभा युवा आघाडीचे अध्यक्ष अमोल वाकचौरे, माजी नगराध्यक्ष दिलीप दारूणकर, अमर लोंढे, संतोष शेलार, सुमित सोनवणे, रामभाऊ सोनवणे, प्रशांत लुटे, विलास वालझाडे, राजेंद्र वालझाडे, ज्ञानेश्वर महापुरे, चेतन सुर्यवंशी, बाबासाहेब कर्डीले, राजेंद्र राऊत, आनंद शेलार, रामदास गायकवाड, बाळासाहेब राऊत आदी उपस्थित होते.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.