कोल्हेवाडी येथील विहिरीत युवकाचा मृतदेह आढळला.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- संगमनेर तालुक्यातील कोल्हेवाडी शिवारातील विहिरीत एका युवकाचा मृतदेह आढळून आला. नवनाथ विश्वनाथ कोल्हे ( वय ३२ रा. कोल्हेवाडी ) असे या युवकाचे नाव आहे. बुधवारी पहाटे साडेपाचच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. याप्रकरणी संगमनेर तालुका पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

----------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
-------------------------------
संगमनेर तालुक्यातील कोल्हेवाडी येथे नवनाथ विश्वनाथ कोल्हे हे कुटुंबियांसह राहत होते. त्यांची पत्नी जळगाव (ता. राहाता) येथे माहेरी गेलेली होती. तर मुलगी घरी होती. मुलगी व ते स्वत: घरात झोपलेले होते. मात्र नजीकच्या रहीवाशांना बुधवारी पहाटे नवनाथ कोल्हे यांचा मृतदेह घरानजीकच्या विहिरीत पाण्यावर तरंगताना आढळून आला. याबाबत त्यांनी पोलिसांना माहिती दिली.
--------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN
----------------------------------
पोलिसांनी घटनास्थळी येत मृतदेह विहिरीतून बाहेर काढीत पंचनामा केला. त्यानंतर मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी हलविला. मयताचे भाऊ जालिंदर विश्वनाथ कोल्हे यांनी पोलिसात खबर दिली. त्यानुसार संगमनेर तालुका पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोलीस निरीक्षक सुनील पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हे.कॉ.लक्ष्मण औटी अधिक तपास करीत आहे.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.