कांद्याचा ट्रक पळविणाऱ्यावर कारवाईसाठी शेतकऱ्याचे उपोषण.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- राहुरी तालुक्यातील मल्हारवाडी येथील कांदा उत्पादक शेतकरी अर्जुन जाधव यांच्या मालकीच्या शेतातील सुमारे ४५० गोणी कांदा अंदाजे रक्कम चार लाख रुपये दि.१९ फेब्रुवारी रोजी राहुरी शहर हद्दीत कोर्टाजवळ ट्रकसह गाडे नामक व्यक्तीने धाकदपटशहा करुन पळवून नेल्याप्रकरणी राहुरी पोलिसात दाखल गुन्ह्याप्रकरणी तीन दिवस उलटून देखील आरोपीस अटक न झाल्याने अर्जुन जाधव यांचे कुटुंब व मल्हारवाडी ग्रामस्थ अबालवृद्धांसह राहुरी पोलिस ठाण्यासमोर महसुल आवारात बेमुदत उपोषणास बसले आहेत. जोपयंर्त न्याय मिळून झालेल्या नुकसानाची भरपाई व संबंधितावर कारवाई होत नाही तोपयंर्त उपोषणस्थळ सोडणार नसल्याचा इशारा जाधव कुटुंबासह मल्हारवाडी ग्रामस्थांनी दिला आहे.


----------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
-------------------------------
दि.१९ फेब्रुवारी रोजी अर्जुन जाधव यांच्या वडाचेलवण शिवारातील शेतातील कांदा गोणीत भरुन ट्रक (क्रमांक एम.एच. १६ ए.वाय. ९८३३) मधून विक्रीस वांबोरी बाजारसमितीकडे निघाला होता. सदर ट्रक राहुरी कोर्टाजवळ आला असता शामराव गाडे व अज्ञात तीन व्यक्तींनी ट्रकला आडवे होवून चालकास दमदाटी करत ट्रकमधील कांदागोणीसह ट्रक पळवून नेला, अशा आशयाची फिर्यादीवरुन राहुरी पोलिसात गुन्हा दाखल असून याचा तपास पो.उप.नि.सतिष शिरसाठ हे करत आहेत.

पोलिस तपास सुरु असतानाच जाधव कुटुंबीय आमरण उपोषणास बसले आहेत. कष्टाने कमवलेली जमीन व शेतात घेतलेले कांदा पिक चार महीने सांभाळून तयार केले. हातात चार पैसे पडतील या आशेवर असतानाच अचानक लाखो रुपयांचा कांदा चोरीस गेल्याने जाधव कुटुंबावर आर्थिक संकट कोसळून त्यांना मनस्ताप सहन करावा लागला. 
--------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN
----------------------------------
यात घरातील अबालवृद्धांसह सर्वांनाच रडू कोसळले व उपोषणस्थळी जाधव कुटुंबीय भावविवश होवून अश्रू ढाळताना दिसून आले. उपोषणस्थळी नगराध्यक्ष प्राजक्त तनपुरे,जि.प.सदस्य शिवाजीराव गाडे यांनी भेट देत जाधव कुटुंबास धीर देत पोलिस निरिक्षक प्रमोद वाघ यांना तपासाबाबत जाब विचारुन कांदा चोरीतील मुद्देमाल व आरोपी यांचा शोध घेवून तत्काळ कारवाई करण्यास सांगितले आहे. अन्यथा उपोषण चालूच राहील,असेही त्यांनी सुनावले.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.