महिलेच्या गळ्यातील सोन्याचे गंठण चोरून पोबारा

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- संगमनेर शहरातील नगर रोडवरील विघ्नहर्ता लॉन्ससमोर एका पादचारी महिलेच्या गळयातील सुमारे ४० हजार रुपये किमतीचे सोन्याचे मिनी गंठण दुचाकीहून आलेल्या दोन चोरट्यांनी ओरबाडत धूम स्टाईलने पोबारा केल्याची घटना मंगळवारी (दि. २०) दुपारी दोन वाजेच्या सुमारास घडली. 

--------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN
----------------------------------
याबाबत शहर पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, सोनाली नागेश भवर (रा. समनापूर) ही महिला मंगळवारी दुपारी दोन वाजेच्या सुमारास नगररोड वरील विघ्नहर्ता लॉन्स समोरुन पायी जात असतांना त्याच दरम्यान मागून मोटारसायकलीवरुन येणाऱ्या चोरट्यांनी धूम स्टाईलने भवर या महिलेच्या गळ्यातील ४० हजार रुपये किमतीचे दोन तोळे सोन्याचे गंठण चोरुन पोबारा केला.
----------------------------
ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा Ahmednagarlive24 App https://goo.gl/A1KePS 
-------------------------------

त्यावेळी त्यांनी आरडाओरडही केला. पण तोपर्यंत हे चोरटे दिसेनासे झाले होते. याप्रकरणी सोनाली भवर यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन शहर पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गंठन चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक गोकुळ औताडे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक पंकज निकम हे करत आहेत.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.