शिर्डीत बँक महिला कर्मचाऱ्याची बॅग धूमस्टाईल लांबविली

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- बचत गटाचे पैसे जमा करुन बँकेत जाणाऱ्या बँक कर्मचारी महिलेच्या गाडीचा पाठलाग करत दोन अज्ञात चोरट्यांनी गाडीचा वेग कमी झाल्याचा फायदा उठवत गाडीला असणारी बॅग लंपास केली. त्यात सुमारे ४६ हजार रुपयांचा ऐवज होता.

--------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN
----------------------------------
याबाबत शिर्डी पोलिसांत दिलेल्या फिर्यादीत राहाता येथील बंधन बँकेच्या महिला कर्मचारी आयशा अन्वर शेख (रा. श्रीरामपूर) यांनी म्हटले आहे की, २१ फेब्रुवारी रोजी सकाळी साडेनऊ वाजेच्या सुमारास शिर्डी येथील इनामवाडी येथील सायरा समिर शेख यांच्याकडून बचत गटाचे पैसे घेऊन बॅगमध्ये ठेवले.
----------------------------
ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा Ahmednagarlive24 App https://goo.gl/A1KePS 
-------------------------------

सदर बॅग ॲक्टीवा गाडी (क्र. एमएच १७ यु ६६५५) वर फुटरेसवर ठेवून येत असताना शिर्डीतील कांदळकर वस्ती नजिक मोठे गतीरोधक आल्याने गाडीचा वेग कमी होताच पाठीमागून येणाऱ्या दोन अनोळखी व्यक्तींनी सदर बॅग घेऊन पसार झाले. सदर बॅगेत दोन हजार रुपयाच्या ७, पाचशेच्या २३, दोनशेची एक, शंभरच्या १७३, पन्नासच्या ३०, वीसच्या २०, दहाच्या ६९ नोटा असा ४५ हजार ५९० रुपयांची रोकड होती. याशिवाय पैसे गोळा करण्याचे मशिन, कलेक्शन रजिस्टर,चोरीस गेले आहे. याबाबत शिर्डी पोलिसांत गु.र.नं. ३२/२०१८ भा.दं.वि. कलम ३७० प्रमाणे दाखल करण्यात आला आहे.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.