बेपत्ता पोलीस मुलाचा शोध घ्या आईची आर्त हाक

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- शिर्डी वाहतूक शाखेचे पोलीस हवालदार संजय बाळासाहेब शिंदे (वय ४०) दोन महिन्यांपासून बेपत्ता आहेत. शिंदे यांच्या आई चंद्रकला यांनी पोलीस ठाण्याच्या बोर्डखाली हताशपणे बसलेली असताना 'मला एकच मुलगा असून तोच माझ्या म्हातारपणाचा आधार' असे म्हणून अश्रुला मोकळी वाट करुन दिली. मुलाला काही दगा फटका तर झाला नाही ना? याची चिंता त्यांच्या बोलण्यातून दिसून येत होती.

--------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN
----------------------------------
बेपत्ता शिंदे राजुरी (ता.राहाता) येथे आपल्या आई समवेत राहतात. शिर्डी येथे वाहतूक शाखेत कार्यरत आहेत. कामावरून घरी न परतल्याने त्यांच्या आईने संपर्क केला असता त्यांनी २० डिसेंबरला दिवसपाळीची ड्युटी करुन गेले, ते अद्याप पुन्हा कामावर हजर नसल्याचे सांगितले. आई चंद्रकला बाळासाहेब शिंदे (वय ६५) यांनी सर्व नातेवाईकांकडे चौकशी केली. मात्र, त्यांचा तपास लागला नाही.

घटनेची माहिती शिर्डी येथील अंमलदाराला सांगितली, यावरुन दि. २५ डिसेंबर रोजी शिर्डी पोलिसांनी मिसींग रजि.नं.७७/१७ ला नोंद करुन पुढील तपासासाठी उपनिरीक्षक संदीप दहिफळे यांची नेमणूक करण्यात केली. मात्र, दोन महिन्यातील तपासात फारसी प्रगती नसल्याची खंत चंद्रकला शिंदे यांनी व्यक्त केली.
----------------------------
ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा Ahmednagarlive24 App https://goo.gl/A1KePS 
-------------------------------

पतीच्या अकाली निधनानंतर मोलमजुरी करुन तिने आपल्या मुलाला बी.एस्सी ॲग्रीपर्यंत शिकवले. त्याला मोठा अधिकारी करता आला नाही, पण तो पोलीस भरती झाला. त्याच वेळी नातेसंबंधातील मुलगी पोलीस झाली होती. तिच्याबरोबर त्याचा विवाह पार पडला. दोन वर्षाच्या संसारात एका मुलाचा जन्म झाला. 

२००४ सालापासून ते विभक्त राहतात. पोलीस आणि त्याची आई जवळपास १३ वर्षांपासून राजुरी येथे गावठाणाच्या जागेत राहतात. आपण केलेल्या कष्टाचे चीज झाल्याचे समाधान चंद्रकलाताईंच्या मनात असतानाच दोन महिन्यांपासून मुलगा गायब झाल्याने त्यांची चिंता वाढली आहे. माझा मुलगा कुणी शोधून देईल का? या चिंतेत ती माता सैरभैर झाली आहे. 

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.