राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या इमारतीसाठी 5 कोटींचा निधी मंजूर

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- संगमनेर शहर हे शैक्षणिक, सहकार, आर्थिक व व्यापारी क्षेत्रातील प्रगतीमुळे झपाट्याने वाढले असून विविध क्षेत्रात मा.महसूलमंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली संगमनेरचा लौकिक देशभर वाढला आहे. शहराच्या वैभवात भर टाकणारी सर्वसुविधांयुक्त विविध इमारती अशी संगमनेरची ओळख निर्माण झाली आहे. या वैभवात भर टाकरणारी राज्य उत्पादन शुल्क विभागाची कार्यालयीन इमारत व अधिकारी व कर्मचारी यांचेकरीता निवासस्थानाकरीता आमदार बाळासाहेब थोरात यांच्या प्रयत्नातुन 5 कोटी 25 लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे.


--------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN
----------------------------------
नव्याने अद्यावत होत असलेली ही इमारत विकासाच्या दृष्टीने आणखी एक वैभवाचे पाऊल ठरणार आहे. आमदार बाळासाहेब थोरातांनी शहरात संगमनेर बायपास, प्रवरा नदीवर मोठा पूल, जुन्या पुलास नवीन समांतर पूल, निळवंडे धरणातून थेट पाईपलाईन, अद्यावत तहसील इमारत, प्रांत कार्यालय इमारत, नगरपालिका इमारत, पंचायत समिती इमारत, न्यायालय इमारत, कवी अनंत फंदी खुले नाट्य गृह, भव्य क्रिडा संकुल, शासकीय विश्रामगृह या वैभवशाली इमारती उभ्या केल्या आहे.
----------------------------
ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा Ahmednagarlive24 App https://goo.gl/A1KePS 
-------------------------------

तसेच सध्या प्रगतीपथावर काम सुरु असलेल्या बसस्थानकामध्ये अत्याधुनिक भव्य पार्किंग व्यवस्था, शॉपींग मॉल, हॉटेल सुविधा, प्रतीक्षालय सुसज्ज टॉयलेट व्यवस्था, बस डेपो व बसस्थानक परिसरात कॉंक्रेटीकरण, पेव्हींग ब्लॉक अशा अत्याधुनिक सुविधांसह शहराच्या वैभवात भर टाकणारी सर्वसुविधांयुक्त असे नवे हायटेक बसस्थानक लवकरच कार्यन्वित होणार आहे. त्यापाठोपाठ संगमनेर राज्य उत्पादन शुल्क विभागाची कार्यालयीन इमारत व अधिकारी व कर्मचारी यांचे करीता निवासस्थानाकरीता 5 कोटी 25 लाख रुपये खर्चाची भव्य इमारतीचे शहरात काम सुरु होणार आहे.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.