साईबाबांच्या जन्मस्थळासंदर्भात शिर्डीकरांनी घेतली राष्ट्रपतींची भेट.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- साईबाबांच्या जन्मस्थळा संदर्भातील वादग्रस्त विषयावर शिर्डीतील भाजप-शिवसेना पदाधिकाऱ्यांनी महामहिम राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेऊन चर्चा केली.साईसमाधी शताब्दी महोत्सवाच्या शुभारंभप्रसंगी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी शिर्डीत झालेल्या कार्यक्रमात साईबाबांच्या जन्मस्थळा संदर्भात पाथरी गावाचा उल्लेख केल्याने साईभक्तांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता. 

--------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN
----------------------------------
यामुळे नव्या वादाला तोंड फुटल्याने याबाबत शिडीर्तील भाजप- शिवसेना पदाधिकाऱ्यांनी शिर्डी लोकसभा मतदार संघाचे खासदार सदाशिव लोखंडे यांच्या नेतृत्वाखाली भेट घेऊन चर्चा केली. निवेदनात म्हटले आहे की, साईबाबांनी आयुष्यभर जपलेली सर्वधर्म समभावाची ओळख जपण्यास सहकार्य करावे अशी साईभक्तांची भावना आहे.

यापूर्वी अनेकांनी साईबाबांचे जन्मस्थळ, जात किंवा आई वडील कोण होते याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला आहे. परंतु, आपण कोण आहोत हे साईबाबांनीच गोपनीय ठेवले आहे. साईबाबांच्या जन्मस्थळासंदर्भात कोठेही उल्लेख नसताना बाबांचे जन्मस्थान म्हणून पाथरीची ओळख नको. पाथरी गावाच्या विकास संदर्भात आमचे दुमत नाही. मात्र, बाबांचे जन्मस्थळावर शिक्कामोर्तब झाल्यास सर्वधर्म समभावाची ओळख पुसली जाईल, असे नमूद केले.
----------------------------
ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा Ahmednagarlive24 App https://goo.gl/A1KePS 
-------------------------------

यावेळी शिवसेनेचे विधानसभा संघटक कमलाकर कोते, भाजप जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र गोंदकर, शहराध्यक्ष शिवाजी गोंदकर, उपाध्यक्ष सचिन शिंदे, माजी नगरसेवक गजानन शेर्वेकर, शिवसेना तालुका प्रमुख संजय शिंदे, माजी उपनगराध्यक्ष विजयराव जगताप, राहुल गोंदकर, साईराज कोते, रमेश बिडवे, गणेश जाधव, महेश डांगे, साईभक्त राहुल गुप्ता आदी उपस्थित होते.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.