जिल्‍हयात 23 ते 25 फेब्रुवारी या कालावधीत वादळीवा-यासह गारपीट होण्‍याची शक्‍यता.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम : अहमदनगर जिल्‍हयासह उत्‍तर मध्‍य महाराष्‍ट्रामध्‍ये दिनांक 23 फेब्रुवारी 2018 पासून पुढील 72 तासांच्‍या कालावधीत वादळीवा-यासह गारपीट होण्‍याचा इशारा भारतीय हवामान खात्‍याने वर्तविला आहे जिल्‍हयातील नागरिकांनी या संदर्भात दक्षता घेण्‍याचे आवाहन जिल्‍हा आपत्‍ती व्‍यवस्‍थान प्राधिकरणाचे अध्‍यक्ष तथा जिल्‍हाधिकारी अभय महाजन यांनी केले आहे. 

----------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
-------------------------------
जिल्‍हयातील नारिकांनी शेतमाल सुरक्षित ठिकाणी साठवून ठेवावा, बाजार समितीमध्‍ये शेतमाल विक्रीसाठी आणला असेल किंवा त्‍याप्रमाणे नियोजित केले असेल तर या मालाचे नुकसान होणार नाही याची काळजी घ्‍यावी. वीजेपासून व गारापासून बचावासाठी सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्‍यावा, धोकादायक ठिकाणी सेल्‍फी काढू नये. मोकळे मैदान, झालीखाली विद्युतवाहिनी अथवा ट्रॉन्‍सफॉर्मजवळ थाबू नये. सर्व प्रकारच्‍या विद्युत तारा, विद्युत खांबापासून दूर रहावे. जनावरे सुरक्षित ठिकाणी स्‍थलांतरीत करावी. अतिवृष्‍टीमुळे शेतीमालाचे नुकसान टाळण्‍यासाठी शेतकरी बांधवांनी वेळीच नियोजन करावे.

सर्व नागरिकांनी वादळी वारे, वीज आणि गारपीटीपासून स्‍वतःपासून गुरा-ढोरांचे संरक्षण होईल याची दक्षता घ्‍यावी, आपत्‍कालीन परिस्थितीत नजीकचे तहसील कार्यालय, पोलिस स्‍टेशन यांचेशी संपर्क साधावा तसेच जिल्‍हा नियंत्रण कक्ष जिल्‍हाधिकारी कार्यालय अहमदनगर येथील टोल फ्री दूरध्‍वनी क्रमांक 1077 , 0241-2323844 व 2356940 वर संपर्क साधावा.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.