नगर शहरावर पुन्हा जलसंकट ? २४ तासांत वीजपुरवठा खंडित केला जाणार !

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- नागरिकांना चांगले रस्ते, पाणी, वीज देण्याची जबाबदारी महापालिकेची आहे. तथापि, ही जबाबदारी पेलण्यात महापालिका प्रशासन वारंवार अपयशी होत आहे. पाणीपुरवठा योजनेवरील वीजदेयकापोटी सुमारे १६३ कोटी थकीत आहेत. चालू वर्षाची निव्वळ थकबाकी सुमारे ९ कोटी आहे. थकीत रक्कम तातडीने भरावी, अन्यथा २४ तासांत वीजपुरवठा खंडित केला जाईल, असा इशारा महावितरणने बुधवारी दिला. त्यामुळे आता पुन्हा एकदा पाणीपुरवठ्याची वीज खंडित होण्याची शक्यता आहे. 

----------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
-------------------------------
नगर शहराला मुळा धरणातून सुमारे ३५ किलोमीटर अंतरावरून पाणीपुरवठा केला जातो. या योजनेवर तीन वीज कनेक्शन आहेत. हे पाणी पंम्पिंग करून आणावे लागत असल्याने दरमहा पाणीपुरवठ्यापोटी दीड ते पावणे दोन कोटी बिलाचा भार मनपाला सोसावा लागतो. सध्या महापालिकेची आर्थिक परिस्थिती बिकट असून दैनंदिन खर्च भागवणेही अवघड झाले आहे. ही यंत्रणा आर्थिक चणचणीमुळे ठप्प होण्याच्या उंबरठ्यावर आहे. 

राज्यात, मनपात भाजप व शिवसेनेची सत्ता आहे. सत्ताधाऱ्यांनी शासनाकडून मागील थकबाकीचे त्रांगडे मिटवण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे. शासनाकडून मिळणारे अनुदान तुटपुंजे असून मनपाला पाणीयोजना चालवणे डोईजड झाले आहे. महापालिकेकडे १६३ कोटी ६३ लाख १८ हजार रुपयांची थकबाकी आहे. चालू वर्षाची जानेवारी २०१८ अखेर १५ कोटी ७ लाख १९ हजार रुपये बाकी आहे. त्यापैकी महापालिकेने आतापर्यंत ६ कोटी ६२ लाखांचा भरणा केला आहे. अजून सुमारे ८ कोटी ९९ लाख ८६ हजार रुपये थकीत आहेत. 
--------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN
----------------------------------
पाणीपुरवठा योजनेवरील बिलाच्या थकबाकीपोटी महावितरणने दोन-तीन वेळा वीजपुरवठा खंडित केला होता. त्यावेळी शहराचा पाणीपुरवठा विस्कळीत होऊन नगरकरांना मोठा त्रास सहन करावा लागला. महावितरणने दणका दिल्यानंतर मनपा अधिकाऱ्यांनी धावपळ करून काही रक्कम भरल्यानंतर वीजपुरवठा सुरळीत करण्यात येतो. 

जर भरणा करायचाच असेल, तर विद्युत पुरवठा खंडित होईपर्यंत मनपा कोणाची वाट पाहते, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. पुन्हा एकदा महावितरणने २४ तासांत थकबाकी न भरल्यास वीजपुरवठा खंडित करण्याचा इशारा दिला आहे. याव्यतिरिक्त विविध कामांची बिले मिळावीत, यासाठी ठेकेदारांकडूनही मनपाकडे तगादा सुरू अाहे. उत्पन्नापेक्षा खर्च जास्त होत असल्याने प्रशासन चांगलेच हैराण झाले आहे.

तीन वर्षांत २६ नोटिसा महापालिकेला पाणीपुरवठा योजनेच्या विद्युत देयकापोटी महावितरणने आतापर्यंत २५ नोटिसा बजावल्या आहेत. या नोटिसा २०१५ ते २०१८ पर्यंतच्या आहेत. महापालिकेच्या उदासीन कारभारामुळे यंत्रणाच अडचणीत आली आहे. नगरकरांमधून मनपाच्या कारभाराबाबत नाराजीचा सूर उमटत आहे.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.