रस्त्याच्या कामासाठी २ कोटी ७० लाख मंजूर : ना. राम शिंदे.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- जामखेड तालुक्यातील चार किलोमीटर रस्त्याच्या कामासाठी पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांनी २ कोटी ७० लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे. तर करमाळा तालुक्यातील दहा किलोमीटर रस्त्यासाठी करमाळयाचे आमदार नारायण पाटील यांनी ५ कोटी २२ लाख रुपयांचा निधी मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतर्गंत मंजूर केला आहे. 

----------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
-------------------------------
जवळा गावासह तरडगाव, बाळेवाडी, पोटेगाव व बोरगाव ही पाच गावे पक्क्या डांबरी रस्त्याने जोडली जाणार आहेत. जवळा, तरडगाव, बाळेवाडी, पोटेगाव, बोरगाव ही सर्व गावे सीना काठची असल्याने दुर्लक्षित होती. हा रस्ता जामखेडला करमाळयाशी जोडण्यासाठी पर्यायी मार्ग ठरणार आहे. 

जवळा ते तरडगाव संगोबामार्गे करमाळा हे अंतर १८ किलोमीटर आहे. तर जवळा ते आळजापूर ते पोथरेमार्गे अंतरही १८ किलोमीटरच आहे. या रस्त्यामुळे करमाळा तालुक्यातील संगोबा येथील प्रसिध्द श्री आदिनाथ देवस्थान अवघ्या १३ किलोमीटरवर आले आहे. 
--------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN
----------------------------------
हा रस्ता झाल्यानंतर भाविकांना हा रस्ता अधिक सोईस्कर होणार आहे. तर करमाळा तालुक्यातील श्री कमलादेवी साखर कारखाना अवघ्या १६ किलोमीटर अंतरावर आला आहे. या कारखान्यास जवळा भागातून मोठ्या प्रमाणात ऊस वाहतूक होत असते. रस्त्याअभावी या मार्गावर एसटीची वाहतूक नव्हती.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.