विवाहितेचा छळ केल्या प्रकरणी चौघांवर गुन्हा.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी विवाहितेने तक्रार केल्यानंतर न्यायालयाच्या आदेशाने चुलत सासरे व अन्य तिघांविरुद्ध पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. मीना गोरख पारखे (३०, वाकडी, ता. राहाता) असे विवाहितेचे नाव आहे. 

----------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
-------------------------------
संजय रावसाहेब पारखे, यमाजी रावसाहेब पारखे, बंडू गुलाब चितळकर व सोनाली गणेश पारखे (सर्व वांगी, ता. श्रीरामपूर) यांच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला. चार वर्षांपासून ही महिला माहेरी वाकडी येथे राहते. २०११ मध्ये तिचा विवाह गणेश नानासाहेब पारखे याच्याशी झाला. सासरी मानसिक व शारीरिक छळ केला जात असल्याचे तिने तक्रारीत म्हटले आहे. 
--------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN
----------------------------------
९ जानेवारीला टाकळीभान-श्रीरामपूर रस्त्यावर आरोपींनी बळजबरीने वाहनात बसवून पळवून नेले. लाथाबुक्क्यांनी मारहाण करत ५० हजार रुपये व दागिने हिसकावून घेतल्याचे या विवाहितेने दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.