शेवगावच्या कांद्याला कर्नाटक,तमिळनाडूत मागणी

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- शेवगाव येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याला सध्या १५०० ते २१०० रुपये क्विंटल भाव मिळत अाहे. येथून मोठ्या प्रमाणावर कर्नाटक, तमिळनाडू या राज्यात कांदा जात आहे, अशी माहिती समितीचे सभापती संजय कोळगे यांनी दिली. यावेळी समितीचे संचालक संजय कोळगे, कुंडलिकराव चव्हाण, सचिव मुद्दस्सर शेख, उपसचिव म्हस्के उपस्थित होते. 

----------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
-------------------------------
मोंढ्यावर अकरा व्यापारी आडते असून सोमवार, गुरुवार व शनिवारी मोंढा चालू असतो. १००० ते १५०० क्विंटल कांदा विक्रीसाठी येतो. शेवगाव तालुक्याबरोबरच पाथर्डी, नेवासे, गेवराई, बिडकीन, शिरुर आदी तालुक्यांतूनही कांदा येतो. माजी आमदार चंद्रशेखर घुले यांनी दोन वर्षांपूर्वी कांदा मार्केट सुरु करण्यास प्रेरणा दिली, अशी माहिती संचालक संजय फडके यांनी दिली.
--------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN
----------------------------------
कांद्याचे माप झाल्याबरोबर रोख पैसे मिळतात. पूर्वी कांदा घोडेगाव व नगरला घेऊन जावा लागे. या वाहतूक खर्चात आता बचत झाली. कोणत्याही प्रकारची फसवणूक होत नाही, अशी माहिती कांदा व्यापारी संघटनेचे अध्यक्ष बापूसाहेब गवळी यांनी दिली.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.