ट्रक व मोटारसायकल अपघातात एकजण ठार.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- ट्रक व मोटारसायकल अपघातात एकजण ठार, तर दुसरा गंभीर जखमी झाला. ही घटना बुधवारी दुपारी दोनच्या सुमारास शेवगाव-गेवराई राज्यमार्गावरील ग्रामीण रुग्णालयाच्या प्रवेशद्वारासमोर झाली. ईश्वर राजेंद्र कराड (२५ वर्षे, लाडजळगाव, ता. शेवगाव) असे मृताचे नाव असून अनिल कल्याण तांबे (२१, रा. अधोडी, ता. शेवगाव) हा गंभीर जखमी झाला. त्याला नगरला हलवण्यात आले. 

----------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
-------------------------------
शिवाजी विद्यालयात बारावीचा पेपर होता.तो सुटल्यावर विद्यार्थ्यांनी घरी जाण्यासाठी एकच गर्दी केली. ईश्वर कराड व अनिल तांबे हे दोघे दुचाकीवरून (एमएच १६ बीआर ९१०४) बोधेगावकडे येत असताना समोरून भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रकची (एमएच ०४ डीडी १५५४) त्यांना धडक बसली. मोटारसायकल फरफटत जाऊन चाकात अडकून बसली. जखमींना शेवगावच्या ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले. 
--------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN
----------------------------------
ईश्वर यास मृत घोषित करण्यात आले. अनिल गंभीर जखमी असून प्रथम शेवगावच्या खासगी रूग्णालयात व तेथून नगरला हलवण्यात आले. कराड याच्यामागे आई,वडील, भाऊ, विवाहित बहीण असा परिवार आहे. तो स्पर्धा परीक्षेची तयारी करत होता. यापूर्वी तो भारतीय सेनादलात भरती झाला होता. मात्र, काही कारणामुळे तो सेनादलातून बाहेर पडला होता.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.