पारनेर बाजार समितीत कांदा @२३००

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- मागील काही दिवसापासून कांद्याने शेतकऱ्यांना चांगला दिलास दिला आहे. मागील आठवड्यात कांद्याचे दर काहीसे घसरले होते. मात्र बुधवारी पारनेर बाजार समितीत तब्बल ५० हजार ७६० गोण्यांची आवाक झाली. त्यात एक नंबर कांद्याला २००० हजार ते २ हजार ३०० रूपये, तर दोन नंबर कांद्याला १७०० रूपये ते २००० रूपये, तीन नंबर कांद्याला १४०० रूपये ते १ हजार ७०० रूपये प्रति क्विंटल बाजार भाव मिळाला. 

----------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
-------------------------------
मागील बाजाराच्या तुलनेत भावात सरासरी ५०० रूपयांनी वाढ झाल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण होते. पारनेर बाजार समितीत निर्यातक्षम मालाची मोठ्या प्रमाणात आवक होत असल्यामुळे निर्वातदार व्यापारी खरेदीसाठी बाजार समितीत येत आहेत. त्यामुळे निर्यातक्षम मालाला मोठ्या प्रमाणात मागणी आहे.

बाजार समितीत शेतकऱ्यांच्या मालाचे आल्याबरोबर वजन होते व त्यानंतर जाहीर निलाव पद्धतीने विक्री होते. हे बाजार समितीचे वैशिष्ट्ये आहे. त्यामुळे पारनेर, नगर तसेच पुणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा बाजार समितीत होत असलेल्या पारदर्शी व्यवहारामुळे बाजार समितीवर व व्यापारी वर्गावर विश्वास आहे. 
--------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN
----------------------------------
शेतकऱ्यांनी आपला माल शेतावर न विकता चांगली निवड करून बाजार समितीमध्येच विकावा. जेणे करून खाजगी व्यापाऱ्यांकडून फसवणूक होणार नाही. असे आवाहन सभापती प्रशांत गायवकाड, उपसभापती विलास झावरे व व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष मारूती रेपाळे व व्यापारी पांडुरंग काळे, किसन गंधाडे, नंदू देशमुख, उत्तम गाडगे, बबन तामखडे, प्रकाश भंडारी, चेतन भळगट यांनी केले आहे.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.