सत्ताधारी हुकुमशाहीच्या वाटेने चाललेत, ते देशात हुकुमशाही आणतील - अण्णा हजारे.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- शेतकऱ्यांचे प्रश्न व लोकपाल आणि लोकायुक्त कमजोर करणाऱ्या नरेंद्र मोदी सरकारने देशातील जनतेला धोका दिला आहे. त्या साठी शेतकऱ्यांचे व देशातील जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी समान विचारधारा असलेल्या लोकांनी एकत्र यावे असे अवाहन जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे. 


--------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN
----------------------------------
हजारे यांनी पत्रकात पुढे म्हटले आहे की, सत्ता आणि पैशाच्या नशेत राजकारणी बेहोश झाले आहेत. या नशेत समाजाला आपण कोठे घेऊन चाललो आहोत याची त्यांना जाणीव नाही. यातून देश विनाशाच्या जवळ जात आहे. याचा परिणाम गरीब लोकांवर होणार आहे. म्हणून ज्या भारतीयांना वाटते हा देश आपला आहे, स्वातंत्र्यासाठी हजारो देशभक्तांनी आपले बलिदान दिले आहे, त्यांचे बलिदान व्यर्थ जाऊ नये अशा लोकांनी आपले कुटुंब चालवता चालवता दिवसाचे एक किंवा दोन तास देशासाठी द्यावेत असे वाटते. अशा लोकांनी त्यांनी संघटीत होणे गरजेचे आहे.

आपण अता आपल्या देशाला वाचविण्याचा प्रयत्न केला नाही तर इंग्रज भारतात परत येणार नाहीत. मात्र अत्ताचे भारतीय सत्ताधिश हुकुमशाहीच्या बाजूला चालले आहेत ते देशात हुकुमशाही आणतील. देशाला स्वातंत्र मिळून 70 वर्षे झाली मात्र देशात लोकशाही आली नाही.
----------------------------
ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा Ahmednagarlive24 App https://goo.gl/A1KePS 
-------------------------------

देशात अनेक समस्या आहेत. त्यासगळ्या एकाच वेळी सुटणार नाहीत. मात्र समान विचारसरणी असणारे व निष्काम भावनेने एकत्र आले तर हळू हळू देशाच्या समस्यांचा सुटत जातील. ज्यांना देशाच्या समस्यांविषयी चिंता आहे जो देशाचा व समाजाचा विचार करतो ज्याचे जीवन व चारित्र्य शुद्ध आहे तसेच देशासाठी त्याग करण्याची इच्छा आहे मात्र कुठल्याही प्रकारच्या फळाची अपेक्षा नाही अशी लोकांनी एकत्रीत येऊन संघटण करावे व 23 मार्च रोजी दिल्लीत होणा-या आंदोलनात सहभागी व्हावे असे अवाहन पत्रकात केले आहे.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.