पैशांच्या वादातून एका महिलेला जीवे मारण्याची धमकी.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- माझे घेतलेले पैसे परत दे नाहीतर तुझ्या मुलीच्या पाठीमागे गुंडांना पाठवीन, असे म्हणत शिवीगाळ करून एका महिलेला जीवे ठार मारण्याची धमकी दिल्यावरून शिर्डी पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. पुनम शिवानंद पवार रा. श्रीरामनगर या महिलेने शिर्डी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. 

----------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
-------------------------------
यात म्हटले आहे की, माझ्या घरी बचत गटाची मिटींग चालू होती. त्यावेळी अचानकपणे छाया बन्सी मुठे रा. श्रीरामनगर आल्या. त्यांनी माझे घेतलेले पैसे दे नाहीतर तुझ्या मुलीच्या पाठीमागे गुंड पाठवीन, असे म्हणत शिवीगाळ करून जीवे ठार मारण्याची धमकी दिली. यावरून शिर्डी पोलिसांनी भा. दं. वि. कलम 323, 504, 506 अन्वये गुन्हा दाखल केला आहे.

त्याचप्रमाणे मीरा बाळू अग्रवाल रा. कनकुरी या महिलेने देखील छाया बन्सी मुठे विरुद्ध शिर्डी पोलिसांत फिर्याद नोंदवली आहे. यात म्हटले आहे की, व्याजाचे पैसे परत दे नाहीतर आत्ताच्या आत्ता मारून टाकीन, अशी धमकी देऊन मारहाण करून जीवे ठार मारण्याची धमकी दिली. 
--------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN
----------------------------------
यावरून संबंधित महिलेच्या विरोधात शिर्डी पोलिसांत भा. दं. वि. कलम 323, 504, 506 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी महिलेविरोधात या अगोदरही अनेक शेतकऱ्यांना आमिष दाखवून लाखो रुपयांना गंडा घातल्या बाबतच्या तक्रारी असल्याचे समजते. पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रताप इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पो.हे.कॉं. मंडलिक करत आहेत.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.