श्रीगोंद्यात पोलीस उपनिरीक्षक लाचलूचपतच्या जाळ्यात

अहमदनगर लाईव्ह24.कॉम : श्रीगोंदा पोलीस स्टेशनमध्ये नियुक्तीस असलेले गणेश हरिभाऊ जांभळे. यांनी हिरडगाव येथील एक प्रकरणाचा तपास लावण्यासाठी पाच हजार रुपयांची लाच मागितल मात्र तक्रारदाराने तडजोड करून तीन हजार रुपये देण्याचे ठरले. ही रक्कम सात वाजण्याच्या सुमारास जांभळे यांच्या दालनात चौकशी कामी बोलावलेल्या मांडवगण येथील प्रसाद आनंदकर याच्याकडे ही लाचेची रक्कम देण्यास जांभळे याने तक्रारदाराला सांगितले. यामुळे सदर प्रकरणात काही संबंध नसताना प्रसाद आनंदकर या तरुणाचा बळी गेला. 

----------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
-------------------------------
याबाबत सविस्तर हकीगत अशी, तालुक्यातील हिरडगाव येथील तक्रारदार याला निनावी नंबर वरून मोबाईल फोनवर धमकीचे फोन येत होते. यामुळे या तक्रारदाराने याबाबत जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याकडे तक्रार केली. त्यांनी हे प्रकरण श्रीगोंदा पोलीस स्टेशनाला पाठवले. याचा तपास पोलीस उपनिरीक्षक गणेश जांभळेकडे आला. जांभळे याने तक्रारदाराकडे या प्रकरणाचा तपास करण्यासाठी पाच हजार रुपयाची लाच मागितली. तडजोड करून तीन हजार रुपये देण्याचे ठरले. याबाबत तक्रारदाराने ही माहिती लाचलुचपत विभागाला कळवली. त्यानुसार हा सापळा लावण्यात आला .
--------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN
----------------------------------
बुधवार दि.२१ रोजी संध्याकाळी सात वाजण्याच्या सुमारास तक्रारदार आणि पथक यांनी पोलीस स्टेशनच्या आवारात जांभळे कार्यालयात बसले असताना. त्या ठिकाणी जाऊन हे पैसे देताना जांभळे याने ही रक्कम समोर बसलेल्या आनंदकर याच्याकडे देण्याचे सांगितले. ही रक्कम देताना ही कारवाई करण्यात आली. पोलीस उपनिरीक्षक विष्णू ताम्हणे यांच्या मार्गदर्शनाखाली लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने ही कारवाई केली. 

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.