जिल्हा बॅंक शाखेवर दरोड्याचा प्रयत्न.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- राहुरी तालुक्‍यातील कोल्हार खुर्द येथील जिल्हा बॅंकेच्या शाखेवर बुधवारी रात्री साडेबाराच्या सुमारास दरोड्याचा प्रयत्न झाला.कोल्हार खुर्द येथे जिल्हा बॅंक शाखेच्या मागील बाजुने असलेल्या जिल्हा परिषद शाळेचे तार कुंपण तोडून चोरटे आत शिरले. बॅंकेच्या खिडकीचे गज गॅसकटरच्या साहाय्याने कापून खिडकीतून चोरटे बॅंकेत घुसले. 

----------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
-------------------------------
प्रवेश करताच त्यांनी प्रथम बॅंकेत असणाऱ्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या वायर तोडल्या. चोरट्यांनी बॅंकेच्या तिजोरीकडे मोर्चा वळवला. तिजोरीच्या खोलीत प्रवेश करत असतानाच बॅंक व्यवस्थापन अलर्ट मेसेजची सुविधा असल्याने बॅंक कर्मचा-यांच्या मोबाइलचा अलार्म वाजला. 
--------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN
----------------------------------
व्यवस्थापक बॅंकेच्या जवळच राहत असल्याने त्यांनी एका ग्रामस्थाला बॅंकेकडे पाठवले. यानंतर व्यवस्थापकांनीही बॅंकेकडे धाव घेतली. कोणीतरी येत असल्याची चाहूल लागल्याने चोरट्यांनी पळ काढला. 15 ऑगस्ट 2016 च्या मध्यरात्रीही ही बॅंक फोडण्याचा प्रयत्न झाला होता. त्यावेळी चोरटे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले होते. परंतु, त्यांचा अद्यापही तपास लागलेला नाही.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.