वैद्यकीय अधिकाऱ्याच्या घरात आठ लाख सत्तर हजाराची चोरी.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- संगमनेर शहरालगत असलेल्या आझाद चौक या उपनगरात अज्ञात चोरट्यांनी वैद्यकीय अधिकाऱ्याच्या घरी जबरी चोरी करत तब्बल नऊ लाखाचा मुद्देमाल लंपास केला. चोरट्यांनी चोरी करत संगमनेर शहर पोलिसांसमोर तपासाचे आव्हान निर्माण केले आहे. काही महिन्यापुर्वी याच परिसरातील एक एटीएम फोडुन अज्ञात चोरट्यांनी मोठी रोकड लांबविली होती. या चोरीमुळे शहरात खळबळ उडाली आहे.

----------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
-------------------------------
घुलेवाडी ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी संदीप कचोरीया यांच्या घरी चोरीची ही घटना घडली असून चोरट्यांनी स्वयंपाक घराच्या खिडकीचे ग्रील कापुन आत प्रवेश करुन डॉ. कचोरीया बेडरुममध्ये झोपलेले असतांना बेडरुमला बाहेरुन कडी लावुन घेत ही चोरी केली.

यावेळी त्यांच्या पत्नी तळेगाव दिघे येथे बीव्हीजी कंपनीच्या रुग्णवाहिकेसाठी वैद्यकीय अधिकारी म्हणुन ड्युटीवर होत्या. मध्यरात्री अडीचच्या सुमारास डॉक्टरांचा मुलगा पाणी पिण्यासाठी उठला होता. त्यानंतर पहाटे साडेपाच वाजता डॉक्टर नेहमीप्रमाणे उठले असता त्याना बेडरुमचा दरवाजा बाहेरुन बंद केल्याचे आढळले.
--------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN
----------------------------------

त्यांनी याची माहिती शेजारी राहणाऱ्या मित्राला देत मदतीसाठी बोलावले असता मित्राला गेटचे मुख्य प्रवेशद्वाराचे कुलुप तोडल्याचे आढलले. तसेच दक्षिणेकडील दरवाजा उघडा आढळला. त्याने डॉक्टरांच्या बेडरुमचा दरवाजा उघडुन त्यांना बाहेर काढल्यानंतर घरात चोरी झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. 

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.