“जनसेवा’च्या माध्यमातून डॉ.सुजय विखेंचे दक्षिणायन सुरू..!

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- डॉ. सुजय विखे यांनी लोकसभेसाठी दक्षिणायन सुरू केले आहे. कित्येक दिवस मुहूर्ताच्या प्रतीक्षेत असलेल्या जनसेवा कार्यालयाचा उद्‌घाटन सोहळा गुरुवारी (दि.22) होत आहे.विधानसभा विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांचे चिरंजीव डॉ. सुजय विखे पाटील हे नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्याच्या तयारीत असल्याने दक्षिणेत आपली ताकद उभी करीत आहेत. 

----------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
-------------------------------
जुन्या विखे गटाला बरोबर घेऊन तरुणांचे संघटन करण्यावर डॉ. विखे यांनी भर दिला आहे. सभा, सामाजिक, राजकीय, कौटुंबिक कार्यक्रमांना हजेरी लावून डॉ. विखेंनी नगर दक्षिण मतदारसंघात चांगले पाय रोवले आहेत. जुन्या-नव्या कार्यकर्त्यांचा मेळ घालून डॉ. विखे यांची वाटचाल सुरू आहे.

गेल्या काही महिन्यांपूर्वी डॉ. सुजय विखे पा. यांनी श्रीगोंदा शहरातील बगाडे कॉर्नर येथे “जनसेवा फाउंडेशन’च्या माध्यमातून अद्ययावत जनसंपर्क कार्यालय उभारले. मात्र, या कार्यालयाचा उद्‌घाटन सोहळा झाला नव्हता. अखेर गुरुवारी राज्य साखर संघाचे अध्यक्ष शिवाजीराव नागवडे यांच्या अध्यक्षतेखाली व विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते या जनसंपर्क कार्यालयाचे उद्‌घाटन होणार आहे. या कार्यक्रमासाठी आमदार राहुल जगताप प्रमुख पाहुणे असणार आहेत.
--------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN
----------------------------------

डॉ. सुजय विखे पाटील यांनी मंगळवारी श्रीगोंद्यात बैठक घेऊन कार्यक्रमाचे नियोजन आखले आहे. विखे पाटील यांचे श्रीगोंद्यात जनसंपर्क कार्यालय होत असल्याने जुन्या विखे गटामध्ये नवचैतन्य पसरले आहे. सोबतच नव्यांचादेखील “छुपा’ ओढा सद्यस्थितीत डॉ. सुजय विखेंकडेच दिसत आहे. डॉ. विखेंच्या “जनसेवा’च्या उद्‌घाटन सोहळ्याकडे अनेकांचे लक्ष लागून राहिले आहे.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.