ठसकेदार लावणीचा महिलांनी लुटला आनंद.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- महाराष्ट्राची लोककला असलेल्या मराठमोळी लावणीचा खास महिलांनी महिलांसाठी आयोजन करुन ठसकेदार लावणीचा आनंद लुटला. माऊली सभागृहात लायनेस क्लब ऑफ अहमदनगर मिडटाऊनच्या वतीने लावणी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. बालगंधर्व पुरस्कार विजेत्या तथा युवा लावणी सम्राज्ञी पुजा पाटील, पुनम कुडाळकर, सुनिता कळमकर व त्यांच्या सहकार्‍यांनी ढोलकीच्या तालावर बहारदार लावणीचा नजराणा पेश केला. या मराठमोळ्या लावणीला महिलांनी टाळ्यांच्या कडकडाटात चक्क शिट्टयांनी दाद दिली. तर काही महिला बेभाण होवून कलाकारांबरोबर थिरकल्या.


----------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
-------------------------------
सामाजिक कार्यात अग्रेसर असलेल्या लायनेस क्लबच्या महिलांनी या लावणी महोत्सवाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमातून जमा झालेले पैसे श्रीगोंदा तालुक्यातील बाबा आमटे वसतीगृहात शिक्षण घेत असलेल्या पारधी समाजाच्या मुलांच्या शिक्षणासाठी दिले जाणार आहेत. या वसतीगृहात शिकत असलेल्या सत्तर पारधी समाजातील मुलांना लायनेस क्लबनी दत्तक घेतले आहे. प्रारंभी प्रियदर्शनी महिला मंडळाच्या अध्यक्षा तथा कार्यक्रमाच्या मुख्य प्रायोजिका पुष्पाताई काळे यांच्या हस्ते नटराज पूजन होवून दीपप्रज्वलनाने लावणी महोत्सवाचे उद्घाटन झाले. यावेळी प्रमुख पाहुण्या म्हणून महापौर सुरेखा कदम व डिस्ट्रिक्ट प्रांतपाल डॉ.वर्षा झंवर उपस्थित होत्या.

प्रास्ताविकात क्लबच्या अध्यक्षा लतिका पवार यांनी राबविण्यात येणार्‍या विविध सामाजिक उपक्रमाची माहिती देवून, या उपक्रमासाठी सहकार्य करणार्‍यांचे ऋण व्यक्त केले. पाहुण्यांचे स्वागत माजी प्रांताध्यक्षा राजश्री मांढरे यांनी केले.
--------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN
----------------------------------

पुष्पाताई काळे म्हणाल्या की, सामाजिक कार्यात लायनेसचे चालू असलेले कार्य प्रेरणादायी आहे. लावणीचा कार्यक्रमात पुरुषांची मक्तेदारी न ठेवता महिलांनी महिलांसाठी केलेला उपक्रम कौतुकास्पद आहे. यामुळे महिला कलाकारांना देखील प्रोत्साहन मिळणार आहे. तसेच कार्यक्रमाच्या माध्यमातून मिळणारे उत्पन्न वंचित घटकातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी दिले जाणार असल्याचे त्यांनी कौतुक केले.

या लावणी महोत्सवासाठी महिला बालकल्याण समितीच्या सभापती सारिका भुतकर, नगरसेवक संपत बारस्कर, नगरसेविका शीतल जगताप, छायाताई फिरोदिया, माजी महापौर अभिषेक कळमकर, पुजा शिंदे, नम्रता सत्रे, उषाताई नलवडे, नगरसेविका मनिषा बारस्कर-काळे, सुरेश वाबळे, शिवाजी कपाळे, सुरेश चव्हाण, आप्पासाहेब होले, संदीप पिसाळ, कुंदन दिवाणे, डॉ.सोनाली मोटे, अब्रार शेख, प्रसाद मांढरे, डॉ.समर रणसिंग, सविता मोरे, वैशाली ससे, सागर कायगावकर, शिवाभाऊ चव्हाण यांचे प्रायोजकत्व लाभले. यावेळी उपाध्यक्षा सुरेखा कडूस, सचिव संपुर्णा सावंत, छाया रसाळ, निर्मलाताई मालपाणी, छाया राजपूत, श्रीकांत मांढरे, लावणी ग्रुपचे योगेश देशमुख आदि उपस्थित होते. 

या लावणी महोत्सवाला उत्सफुर्त प्रतिसाद लाभून, संपुर्ण सभागृह महिलांनी गच्च भरले होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन जया भोकरे व अमल ससे यांनी केले. आभार आश्‍विनी भंडारे यांनी मानले.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.