गरिबी व कर्जास कंटाळून कर्जत तालुक्यात शेतकऱ्याची आत्महत्या.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- कर्जत तालुक्यातील कोरेगाव येथील शेतकरी मारुती वाघ यांनी गरिबी व कर्जास कंटाळून विष प्राशन करून आत्महत्या केली. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुले असा परिवार आहे. कोरेगाव येथील मारुती बाबा वाघ (वय ६०) हे अल्पभूधारक शेतकरी आहेत. 

----------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
-------------------------------
घरचा कुटुंबाचा उदरनिर्वाह भागविण्यासाठी शेती पुरेशी नव्हती. शेतीसाठी पतसंस्था व स्थानिक देना बँक यांचे कर्ज त्यांनी काढले होते; मात्र, पुरेसे उत्पादन येत नव्हते व आले तरी शेतीमालास भाव मिळत नव्हता यामुळे कर्ज थकले हाते. गरिबीमुळे वाघ हे त्रस्त झाले होते. 
--------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN
----------------------------------

दोन दिवसांपूर्वी त्यांनी गरिबी व कर्जबाजारीपणाला कंटाळून विष प्राशन करून आत्महत्या केली. त्यांना तातडीने नगर येथे खासगी रुग्णालयात नेण्यात आले; मात्र, उपचार सुरू असताना सोमवारी त्यांचे निधन झाले. यानंतर त्यांचा मृतदेह कोरेगाव येथे आणून त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.