आईसह चिमुरड्याचा मृतदेह विहिरीत आढळला

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- संगमनेर तालुक्यातील कौठे धांदरफळ येथील एका विहिरीत आईसह तीन वर्षीय चिमुरड्याचा मृतदेह आढळून आल्याची धक्कादायक घटना मंगळवार दि. २० फेब्रुवारी रोजी दुपारी ५ वाजेच्या सुमारास उघडकीस आली आहे. योगिनी दिपक खतोडे (वय-२९) व आधिराज दिपक खतोडे (वय-०३, दोघे रा.राजापुर, संगमनेर) असे मयत झालेल्या आई व चिमुरड्याचे नाव आहे. हे दोघेही तीन दिवसांपासून बेपत्ता होते. 

----------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
-------------------------------
याबाबत तालुका पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, राजापूर याठिकाणी दिपक खतोडे हे आपल्या कुटुंबासोबत राहत आहे. पत्नी योगिनी खतोडे व मुलगा आधिराज खतोडे हे दोघेही रविवार दि. १८ फेब्रुवारी रोजी दुपारी चार वाजेच्या सुमारास बेपत्ता झाले असल्याची तक्रार पती दिपक निवृत्ती खतोडे यांनी शहर पोलिस ठाण्यात दिली होती. या दोघांचा शोध घेतला असता ते कुठेही आढळून आले नाही. 

त्यानंतर मंगळवारी दुपारी पाच वाजेच्या सुमारास कौठे धांदरफळ शिवारातील नदीच्या कडेला असणाऱ्या रमेश अर्जुन मोरे यांच्या विहिरीमध्ये योगिनी व आधिराज या दोघांचेही मृतदेह विहिरीतील पाण्यावर तरंगताना आढळून आले.घटनेची माहिती मोरे यांनी दूरध्वनीवरुन तालुका व शहर पोलिसांना दिली.माहिती मिळताच दोन्ही पोलिस ठाण्यातील पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. 
--------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN
----------------------------------

त्यानंतर ग्रामस्थांच्या मदतीने दोघांचेही मृतदेह विहिरीतून वर काढण्यात आले व हे मृतदेह रुग्णवाहिकेद्वारे शवविच्छेदनासाठी संगमनेर कुटीर रुग्णालयात आणण्यात आले. याप्रकरणी रमेश मोरे (रा. वडगाव लांडगा) यांनी दिलेल्या खबरीवरुन तालुका पोलिसांनी अकस्मात मृत्युची नोंद केली आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक सुनिल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार बाळू घोडे हे करत आहेत.या घटनेमुळे तालुक्यासह जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.