आदिवासी आश्रमशाळेतील मुले दोन दिवसांपासून उपाशी.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- गेल्या दोन दिवसांपासून जेवण नाही, जेव्हा मिळत होते तेही उघड्यावर मातीत, त्यासाठी वापरला जात होता सडका कुजलेला भाजीपाला, पिण्याच्या पाण्याची टाकी आठ-आठ दिवस स्वच्छ केली जात नसल्याने पाणीही नाही, वीज नाही,आरोग्य सुविधेबाबत न बोललेच बरे, अशा परिस्थितीत राहुरी तालुक्यातील कोळेवाडी येथील शासकीय आश्रमशाळेतील विद्यार्थी उज्ज्वल भविष्याच्या आशेने ज्ञानाचे धडे गिरवीत आहेत. हा प्रकार ग्रामस्थांनी केलेल्या पाहणीदरम्यान चव्हाट्यावर आल्याने ही 'आश्रमशाळा आहे की, भाकड जनावरांचा कोंडवाडा' अशी प्रतिक्रिया व्यक्त झाली. 

----------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
-------------------------------
राज्य सरकार आदिवासी महामंडळासाठी कोट्यवधीचा निधी पुरविते. मात्र, आश्रम शाळातील मुलांची परिस्थिती पाहिल्यास त्यांना दोन - दोन दिवस जेवण नाही, आरोग्य व्यवस्था नाही, पिण्याच्या पाण्याची सोय नाही, बंदिस्त भोजन व्यवस्था नाही, वीज नाही, शौचालय स्वच्छ नाहीत, अशा एक ना अनेक बाबींचा निदर्शनास आल्या.

राहुरी तालुक्यातील कोळेवाडी येते शासकिय आदिवासी आश्रम शाळा असून याठिकाणी सुमारे २७९ मुले, मुली ज्ञानाचे धड गिरवण्यासाठी माता- पित्यानी सरकारच्या भरवशावर पाठविली. कोट्यवधीच्या निधीची तरतूद असताना शाळा व्यवस्थापनाच्या कामकाजामध्ये दाखविलेल्या कुचराईमुळे या आदिवासी मुलांच्या आयुष्यात दुर्भिष्य मिटण्याची चिन्ह नाहीत.

समोर दिसतयं, मात्र खाता येईना अशी अवस्था या आदिवासी मुलांची दिसून येते. प्रत्यक्षदर्शी ग्रामस्थ व सरपंच यांनी माहिती घेतली असता मुख्याध्यापक दोन - दोन दिवस येत नाही. इंग्रजी विषयाचे शिक्षक तीन वर्षांपासून नाही, दोन - दोन दिवस जेवण मिळत नाहीत. शौचालयाच्या टाकीवर झाकण नाही. पिण्याची टाकी आठ - आठ दिवस स्वच्छ केली गेली नसल्याने पाणी पिण्यायोग्य नव्हते.

मुलांना मातीवर, उघड्यावर जेवण दिले जाते, रात्रीच्या जेवणावळीला अंधारात जेवण दिले जाते. त्यातच भाजीपाला सडका, कुजलेली टोमॅटो, अतिशय लहान बटाटे, सांडपाण्याची व्यवस्था नसल्याने डास व दुर्गंधीयुक्त वातावरण, मुलाच्या वसतिगृहामध्ये अतिशय घाण असल्याचे दिसून आले. 
--------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN
----------------------------------

याठिकाणी शिक्षक व कर्मचाऱ्यांना निवासाची सोय आहे. पंरतु, या ठिकाणी मोजकेच शिक्षक व कर्मचारी राहतात. सुरक्षारक्षक व शिपाई पद रिक्त आहेत. त्यातच प्रथम श्रेणीतील शिक्षक वर्ग सेवानिवासी नसल्याने मुलांकडे दुर्लक्ष होत असून मुख्याध्यापक यांनी प्रभारी म्हणून १ जून २०१७ पासून पदभार हाती घेतला. 

परंतु, सेवा निवासी नसल्याने व्यवस्थामध्ये कोणताही बदल झाला नाही. यावेळी सरपंच लहानबाई राहिज, चांगदेव वायळ, आश्रमशाळेचे व्यवस्थापक अध्यक्ष रामनाथ गवारी, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष जयराम नंदकर, ग्राम सुरक्षा दल अध्यक्ष रावसाहेब कांबळे, राजेंद्र मरभळ, सोन्याबापू आंबेकर, जयवंत कांबळे, दुर्योधन वायळ आदी या वेळी हजर होते. दरम्यान, यावेळी राजूरचे आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी डॉ. ढुबे यांच्याशी भ्रमणध्वनीवरून संपर्क साधला असता होऊ शकला नाही. 

गव्हाची तातडीची मागणी करुनही ठेकेदाराने धान्याचा पुरवठा केला नाही नसल्याचे अधिक्षक एस. एस. सूर्यवंशी यांनी सांगितले. शाळा व्यवस्थापनेला कामकाजाची कोणतेही माहिती दिली जात नसल्याचे आश्रमशाळा व्यवस्थापन अध्यक्ष रामनाथ गवारी यांनी सांगितले. आदिवासी आयुक्त नाशिक यांना तातडीने भेटून विद्यार्थ्यांना न्याय मिळवून देणार असल्याचे प्रा. चांगदेव वायळ यांनी सांगितले.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.