आ.थोरातांचा स्वित्झर्लंडच्या उपराष्ट्रपतींकडून सन्मान

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- राज्याचे माजी महसूलमंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्त्वाखाली महाराष्ट्राच्या राष्ट्रकुल संसदीय मंडळाने स्विस पार्लमेंटला भेट दिली असून यावेळी स्वित्झर्लंडचे व्हा. प्रेसीडेंट ऊलीमाऊरर यांनी आ. थोरात यांचा सन्मान केला आहे.
----------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
-------------------------------
स्वित्झर्लंड देशाची राजधानी बर्न येथे स्विस पार्लमेंटला अभ्यास दौऱ्यासाठी आ. थोरातांच्या नेतृत्त्वाखाली १० आमदारांच्या शिष्टमंडळाने भेट दिली. यावेळी त्यांचे पारंपारिक पद्धतीने स्वागत करण्यात आले. यावेळी स्वित्झर्लंडचे व्हा. प्रेसीडेंट ऊलीमाऊरर व तेथील खासदार उपस्थित होते. याप्रसंगी त्यांनी स्वीस पार्लमेंटच्या कामकाजाची माहिती दिली.

या दौऱ्यात महाराष्ट्राच्या राष्ट्रकुल संसदीय मंडळाच्या सदस्यांनी इंग्लंड, पॅरिस, स्वित्झर्लंड येथील संसदीय लोकशाही प्रणालीचा अभ्यास केला. तेथील कामकाज, सदस्यांचे प्रश्­न मांडणी पद्धती त्याचे निवारण, कार्यवाही, लोकशाही अधिकार, व्यक्ती स्वातंत्र्य अशा वेगवेगळया विषयांना अभ्यास केला. यावेळी शिष्टमंडळाचे अध्यक्ष आ. थोरात यांनी भारतातील समृद्ध लोकशाहीची रचना, लोकसभा, राज्यसभा, विधानसभा व विधानपरिषद यांची कार्यप्रणाली, भारतीय राज्यघटना, भारतीय नागरिकांचे मुलभूत अधिकार, मुलभूत कर्तव्य यांची माहिती दिली. 

--------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN
----------------------------------

तसेच गुंतवणुकीसाठी महाराष्ट्राची भौगोलिक अनुकलता ही या देशाच्या प्रतिनिधींना गुंतवणुकीसाठी अनुकूल असल्याचे सांगितले. जगात १८४८ पासून लोकशाहीतील मतदान पद्धत अस्तित्वात आली. मात्र, या प्रगत देशात महिलांना १९७१ ला मतदानाचा हक्क देण्यात आला. 

या देशाला २०० खासदार असून ४६ राज्यसभा सदस्य, ७ मंत्री, एक व्हाईस प्रेसीडेंट व एक प्रेसीडेंट अशी संसदीय रचना आहे. प्रगती, शिस्त व स्वच्छता असलेल्या या देशाकडून बरेच काही शिकण्यासारखे असून महाराष्ट्रात या देशाने गुंतवणुकीसाठी यावे अशी विनंतीही या शिष्टमंडळाने केली आहे

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.