फसव्या कर्जमाफीचे पाप आ. कोल्हेंना भोगावे लागेल !

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- पुणतांब्यासह राज्यातील आंदोलन आणखी दोन दिवस चालले असते तर शेतकऱ्यांना न्याय मिळाला असता. परंतु शेतकऱ्यांचे आंदोलन आमदार स्नेहलता कोल्हे यांनी मोडीत काढण्याचा प्रयत्न केला. सरकारच्या फसव्या कर्जमाफीचे पाप आ. कोल्हे यांना भोगावे लागेल, अशी टीका युवा नेते आशुतोष काळे यांनी केली.

----------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
-------------------------------
कोपरगाव शहरामध्ये राष्ट्रवादीच्या हल्लाबोल आंदोलनाच्या सभेतील आशुतोष काळे यांच्या वादग्रस्त वक्‍तव्याने सेना-भाजप व राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांच्या वादातून एकमेकांविरोधात पोलिसांत गुन्हा दाखल केला. आ. स्नेहलता कोल्हे यांनी आशुतोष काळे यांच्यावर केलेल्या टीकेला प्रत्त्युत्तर देण्यासाठी काळे यांनी शहरातील गौतम बॅंकेच्या सभागृहात पत्रकार परिषद घेण्यात आली.

काळे म्हणाले, शहरातील हल्लाबोल आंदोलनाच्या सभेला अभूतपूर्व गर्दी पाहिल्याने विरोधकांना धास्ती वाटत आहे. हल्लाबोलच्या सभेने संपूर्ण तालुक्‍यासह राज्याचे वातावरण बदलत आहे. कोपरगावच्या इतिहासातील सर्वांत मोठी सभा झाल्याने विरोधकांनी सभा झाल्याबरोबरच सभेचा निषेध करण्यास सुरुवात केली.
--------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN
----------------------------------

त्यामुळे मूळ प्रश्‍नाला बगल देऊन काहीतरी विषय काढून विचलीत करण्याचे काम आमदार कोल्हे करीत आहेत. कोणताही विषय अंगलट आला की, मी महिला आमदार आहे, असं सांगतात. 2014 पासून असेच चालू आहे. परंतु त्या राज्यात एकट्याच महिला आमदार आहेत का? असा सवाल काळे यांनी केला.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.