विद्यार्थिनीशी असभ्य वर्तन करणार्या प्राध्यापकाची धुलाई.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- पारनेर तालुक्यातील कान्हूर पठार येथील रयत शिक्षण संस्थेच्या जनता विद्यामंदिरात १२ वी विज्ञान शाखेत शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थिनीशी प्राध्यापकाने असभ्य वर्तन केले. हा प्रकार मुलीने आपल्या पालकांना सांगितल्यावर या महाशयांची शाळेमध्येच चांगली धुलाई करण्यात आली. टाकळी ढोकेश्वर येथील राहत्या घरीही या प्राध्यापकाला पत्नीसमोर चोप देण्यात आला.


----------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
-------------------------------
या प्राध्यापकाने नंतर संबंधित मुलीची व तिच्या कुटुंबीयांची माफी मागितल्याने या वादावर पडदा पडला. रयत शिक्षण संस्थेच्या उत्तर विभागाच्या निरीक्षकांच्या गावातील शाळेत हा प्रकार घडला. तथापि, तीन दिवस उलटूनही कोणत्याही प्रकारची कारवाई या लंपट प्राध्यापकावर करण्यात आली नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. या शाळेतील ही दुसरी घटना असल्याने कडक कारवाईची मागणी पालकवर्गातून होत आहे.
--------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN
----------------------------------

कान्हूर पठार येथील जनता विद्यामंदिरमधील विद्यार्थ्यांची तीन दिवसांपूर्वी विज्ञान शाखेची प्रात्यक्षिक परीक्षा होती. पेपर अवघड गेल्याची कल्पना या विद्यार्थिनीने प्राध्यापकाला दिली असता 'तू चिंता करू नकोस, मी तुला पास करतो', असे म्हणून त्याने असभ्य वर्तन केले. या विद्यार्थिनीने रडतरडत ही हकिकत कुटुंबीयांना सांगितल्यानंतर जाब विचारत या प्राध्यापकाची यथेच्छ धुलाई करण्यात आली. याअगोदर याच विद्यालयात मुलीची छेड काढल्याप्रकरणी एका शिक्षकाला मारहाण करण्यात आली होती.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.