नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणुक आप्पासाहेब शिंदे यांची उमेदवारी जाहिर

अहमदनगर लाईव्ह24.कॉम : नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघाची निवडणूक येत्या जुलैमध्ये होत आहे. या निवडणुकीत माध्यमिक शिक्षक संघ व टी.डी.एफ. चळवळीत गेल्या 21 वर्ष काम करणारे अमृतराव ऊर्फ आप्पासाहेब शिंदे यांची उमेदवारी जाहीर झाली. 


----------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
-------------------------------
टी.डी.एफ. संघटनेच्या वतीने इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती पुणे येथे ठेवल्या होत्या. त्या मुलाखतीमध्ये शिक्षक नसलेल्या व्यक्तीला अगोदरच उमेदवारी दिली गेल्यामुळे नाशिक विभागातील एकूण दहा उमेदवारांनी मुलाखतीवर बहिष्कार टाकला व एकत्रितपणे पाचही जिल्ह्यांमध्ये मेळावे घेण्यात आले.

तर माध्यमिक शिक्षक चळवळीत काम करणारा उमेदवार द्यावा ही प्रमुख मागणी करण्यात आली होती. सर्वांनी फिरोज बादशाह यांना उमेदवारी जाहिर करण्याचे अधिकार दिले. परंतु त्यांनी देखील आर्थिक देवाण-घेवाण करून ज्यांच्या माध्यमिक शिक्षक चळवळीशी काहीही संबंध नाही अशा उमेदवारास उमेदवारी दिल्याचा आरोप करीत पाचही जिल्ह्यातील आठ उमेदवारांनी पुन्हा एकदा बंड केले.

नुकतेच सर्वांनी एकत्र येऊन आप्पासाहेब शिंदे यांना पाठिंबा देवून, नगर येथे त्यांची उमेदवारी जाहीर केली. तर यावेळी शिंदे यांच्या निवडणूक कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले. चळवळीतील कार्यकर्त्यांना न्याय मिळण्यासाठी सर्व मतदार बंधू भगिनींनी या प्रक्रियेत सहभागी व्हावे व आपला हक्काचा माणूस विधान परिषदेवर पाठविण्याचे आवाहन करण्यात आले. 
--------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN
----------------------------------
यावेळी चांगदेव कडू, एम एस लगड, मारुती लांडगे, मिलिंद शिंदे, सुभाष कडलग, संजय जाजगे, विलास वाकचौरे, शिरीष टेकाडे, उद्धवराव गुंड, रमाकांत दरेकर, सुनील दानवे, उद्धवराव सोनवणे, प्रशांत होन, महेंद्र हिंगे, नंदकुमार शितोळे, गजानन शेटे, फारूक सय्यद, विजय थोरात, आजिनाथ नेटके, सोन्याबापु पारखे, जनार्दन पटारे, भानुदास खरात, बाळासाहेब जाधव, संभाजीराव गाडे, दिलीप काटे, बाबासाहेब बोडखे आदी उपस्थित होते.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.