पारनेर मध्ये अपघातात तिन तरुण जागीच ठार.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- नगर-कल्याण महामार्गावर भाळवणी (ता. पारनेर) परिसरातील दहावा मैल येथे झालेल्या अपघातात तीन महाविद्यालयीन तरुण जागीच ठार झाले. ही घटना मंगळवारी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास घडली.प्रतिक बाळासाहेब ठाणगे (वय २०, रा. हिवरे कोरडा), सोमनाथ बाळू गांगुर्डे (वय १९, रा. हिवरे कोरडा), दीपक रंगनाथ गांगुर्डे (वय २१, रा. माळकूप) अशी मयत झालेल्या तरुणांची नावे आहेत.
----------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
-------------------------------

मोटारसायकलवरील तिघेजण नगरहून भाळवणीकडे जात होते. त्यांची मोटारसायकल भाळवणी जवळील दहावा मैल परिसरात आली असताना मुंबईहून नगरकडे जाणा-या कारला (क्रमांक एम. एच. ०३, सी. पी. ०१४४) मोटारसायकलची (क्रमांक एम.एच. १६ बी. टी. २६२२) समोरासमोर धडक बसली. हा अपघात एव्हढा भिषण होता की, मोटारसायकलवरील तिघेही सुमारे तीस फुट लांब फेकले गेले तर मोटारसायकलचे पार्ट सुमारे ५० फुटांवर विखुरले गेले. 
-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.